राजमाता जिजाऊ व क्रांतीजोती सावित्रीमाई यांच्या लेकी देशात सुरक्षित आहे का?शरद केदारे मानवाधिकार
शांताराम दुनबळे
हाथरस उत्तरप्रदेश येथील दलित मुलीवरील झालेल्या अमानवी बलात्कार निषेधार्थ, भारतीय मानव अधिकार परिषद वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन, नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून . नाशिक-: सध्या संपूर्ण जगात व
देशावर कोरोना व्हायरस महामारीचे संकट असताना देशात दलित अत्याचाराची मालिका खंडित न होता अविरत सुरू असून, संबंध देशभरात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते आहे.
या देशात लोकशाही व कायदा सुव्यवस्था आहे किंवा नाही याची शंका येथील सर्वसामान्य जनतेला निर्माण झाली असून आमच्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान व विद्यमान केंद्र सरकार सदर दलित अत्याचाराची मालिका खंडित करण्यासाठी काही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. फक्त मोठमोठे दलित संरक्षणाचे कायदे बनवून चालत नाही तर प्रत्येक्षात कायदे अमलात आणून काटेकोर पणे कायद्याच्या चौकटीत राबवावे लागतात. राजमाता जिजाऊ व माता सावित्रीबाई यांच्या लेकी भारता सह इतर ही राज्यात सुरक्षित आहेत का?त्या साठी संविधान व लोकशाही ला मानणारे व न्याय व्यवस्थेवर विश्वास असणारे अधिकारी वर्ग पण असावे लागतात. व त्याच प्रमाणे निर्भीड व प्रामाणिक मीडिया पण असावी लागते असे परखड मत राष्ट्रीय कार्यअध्यक्ष शरदभाऊ केदारे यांनी निवेदनात म्हटले आहे
देशात सुशांत सिंग राजपूत आणि कंगना राणावत शिवाय दुसरे प्रश्नच नाहीत या आविर्भावाने देशाची मीडिया ज्या मीडियाला देशातील जनता लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ म्हणून पाहते त्या आपल्या देशातील जनतेची भ्रमनिराशा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. देशातील प्रचंड वाढलेली बेरोजगारी ,बंद पडलेले कारखाने , नीचांक गाठलेले देशाचे विकास दर, ढासळलेली अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न , दलित बौद्ध आदिवासी व अल्पसंख्यांक वरील वाढते अत्याचार, कोरोना महामारीत मरत असलेले लाखो देशवासी, प्रचंड वाढलेली महागाई, आरोग्यविभागाचे वाजलेले तीन तेरा त्यातच सरकारी विभागाचे व सरकारी कंपन्यांचे मोठ्याप्रमाणात होत असलेले खाजगीकरण व विकण्यात येत असलेल्या सरकारी कंपन्या या बाबत जनतेमध्ये प्रचंड जनजागृती करायचे सोडून सुशांत आणि कंगना या शिवाय दुसरे तुणतुणे मीडिया कडे नाही असे वाटते.
दिनांक १४ सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेश येथील हाथरस येथे एका दलित वाल्मिकी समाजाच्या मनिषा वाल्मिकी १९ वर्षीय भगिनीवर त्याच गावातील सुवर्ण समाजातील गुंडप्रवृत्तीच्या नराधमांनी गँगरेप करून पिडीतीची जीभ कापून पाठीचा कणा मोडेपर्यन्त तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले होते. गंभीर व मरणावस्थेत त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व ९ दिवसानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्या पीडिताने आपल्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचे कथन इशाराने करून चार आरोपींची नावे जाहीर केली होती.परंतु दुर्दैवाने मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी दिल्लीतील एका हॉस्पिटल मध्ये सदर पीडित मुलीचे मृत्यू झाले. व पुन्हा एकदा एका निरागस मुलीला आपला जीव जातीव्यवस्थेतून गमवावा लागला आहे. या अत्यंत निंदनीय व अमानवीय कृत्याचे वांजोटी व्यवस्थेचे व सदर घटनेचे जाहीर तीव्र शब्दात निषेध करत असून,सदर खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालवण्यात येऊन, आरोपींना जलद गतीने कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा भारतीय मानव अधिकार परिषद वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकरी सुरज मांढरे साहेब यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय कार्यअध्यक्ष् भारतीय मानव अधिकार परिषद शरदभाऊ केदारे, उतर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजाभाऊ अभंग विल्सन उमाप उमा सोनवणे सिध्दार्थ लोखंडे उपस्थित होते.






