जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात टवाळखोरांच्या दारू आणि हुक्का पार्ट्यांच्या विळख्यात….
पुरातत्व विभाग सुस्त ..….
औरंगाबाद-
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात टवाळखोरांच्या दारू आणि हुक्का पार्ट्या रंगत आहेत. अजिंठा लेणीच्या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. टवाळ आणि बेशिस्त तरुण तरुणी येथे अनेक अवैध गोष्टींसाठी येतात.या टवाळखोर, नशेखोरांचा देशी आणि विदेशी पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. जागतिक वारसा असलेल्या या पर्यटनस्थळावर नशेखोरांच्या या त्रासाविरुद्ध आता नागरिकांनी तक्रारी केल्या असून दबावामुळे पोलीस प्रशासन जागं झालंय.त्याच प्रमाणे पुरातत्व विभाग ही जागृत होणे आवश्यक आहे. दारु आणि हुक्का पिणाऱ्या टोळक्यांचा पोलीस शोध घेताहेत.अश्या टवाळखोरांविरुद्ध पुरातत्व अधिनियम अंतर्गत देखील कार्यवाही होणे आवश्यक आहे. लेणी जतन आणि संवर्धनच्या नावाखाली पर्यटकांना लुटले जाते.अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात मग शिस्त, नियम आणि बंदोबस्त पुरातत्व विभाग का ठेवू शकत नाही. याचे कारण कळत नाही. की त्यांच्याच आशिर्वाद मुळे अश्या घटना घडतात??????असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औरंगाबाद या शहराला सांस्कृतिक वारसा आहे .बीबी का मकबरा, अजिंठा, वेरूळ लेणी, पाणचक्की, देवगिरी किल्ला, अशा विविध ऐतिहासिक स्थळामुळे औरंगाबाद हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. एतिहासिकदृष्ट्या या जिल्ह्याला जगभरात मोठं महत्व असल्यानं देश विदेशातील पर्यटक औरंगाबादेत येत असता मात्र टावळखोरांमुळे पर्यटकांना अशा ऐतिहासिक पर्यटनस्थळावर त्रास सहन करावा लागतोय.







