?️ Big Big Breaking.. अयोध्या राम मंदिर ट्रस्टला 100 कोटीची देणगी…!2020-2021 या आर्थिक वर्षात आयकर मधून दिली आहे सूट..!
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आतापर्यंत 100 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून १ ऑक्टोबरपासून भव्य मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. असे रविवारी एका अहवालात म्हटले आहे.
देश सध्या कोरोना सारख्या भीषण साथीच्या रोगाच्या विळख्यात आहे.आणि संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे आणि ढासळत आहे.अनेक लोकांचे रोजगार बुडाले आहेत. देशाचा GDP दर झपाट्याने खालावला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर राम जन्म भूमी ट्रस्ट ला मंदिर बांधण्यासाठी मिळालेला पैसा लक्षणीय आहे.
विशेष म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी च्या नेतृत्त्वात सरकारने अयोध्या रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टला आयकर कायद्याच्या कलम जी अंतर्गत ठेवले आहे.म्हणजेच भाजपा नेतृत्वाखालील केंद्र सरकारने रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकरातील तरतुदींमधून सूट दिली आहे.
ट्रस्टला देणग्यासह प्राप्तिकरात सूट ही केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी) अयोध्येत आलेले रामजन्मभूमी मंदिर “ऐतिहासिक महत्त्व आणि सार्वजनिक उपासनास्थळ” असेल म्हणून सूट दिली आहे.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालानंतर रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरण निकाली काढल्यानंतर मोदींनी 15 सदस्यांची ट्रस्ट स्थापन केली आहे.
ट्रस्टने निती गोपाळ दास यांना अध्यक्ष तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरच्या मंदिर बांधकाम समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






