Maharashtra

तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा … दोन्ही आमदारांची नैतिक जबाबदारी

 तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा …
दोन्ही आमदारांची नैतिक जबाबदारी
 अमळनेर तालुक्यात  येथे 85%
दुबार नाही तर तिबार पेरणीचे संकट. बळीराजा धास्तावला
त्वरीत पंचनामे करून भरपाई द्या ..

तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा ... दोन्ही आमदारांची नैतिक जबाबदारी

तालुक्याला दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रतिनिधी लागले आहेत स्वागत समारंभात…. दोन आमदार असूनही कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा पाठपुरावा करण्यात असमर्थ ठरले आहेत.फक्त श्रेय वादाचे राजकारण करण्यात मग्न आहेत.शेतकरी त्यांचे प्रश्न,दुबार पेरणीचे संकट इ गोष्टींची फिकीर लोक प्रतिनिधींना आणि शासनाला नसल्याचे दिसून येत आहे.

तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा ... दोन्ही आमदारांची नैतिक जबाबदारी
   कर्जमुक्तीसाठी बेंबीच्या देठापासून राज्य सरकारपुढे गाऱ्हाणे गाणारा बळीराजा आता दुबार नाही तर तीबार पेरणीच्या संकटामुळे धास्तावला आहे. सुरुवातीलाच चांगली हजेरी लावल्यामुळे मुडी व परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला खरा, पण काही दिवसानंतर  पावसाने आपले नाटक सुरू केले. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतकरी पुन्हा उद्ध्वस्त होऊन जाईल. पुढची सर्वच आर्थिक गणिते चुकतील. त्यामुळेच ‘‘वरुणराजा… कृपादृष्टी दाखव रे आमच्यावर… कोसळ रे एकदाचा बाबा आणि आम्हा सर्वांनाच निर्धास्त कर’’ असे साकडे बळीराजा पुनः पुन्हा पावसाला घालत आहे.
पावसाच्या तुटीमुळे  विदर्भ आणि मराठवाडा ऑगस्टमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून खान्देशातील बहुतांश भागात भीषण दुष्काळ पडला आहे. यंदाही अनेक ठिकाणी दुबार पेरण्या झाल्या आहेत. मात्र खानदेशात कृत्रिम पाऊस पडण्याची आवश्यकता नाही असे राज्य सरकारला वाटत असल्याचे दिसते.
 मुडी येथे आतापर्यंत 85%टक्के दुबार पेरणी झाली असुन जर अजुन काही दिवस पाउस लांबल्याने तिबार पेरणी च संकट बळीराजा समोर येऊन उभा राहील अन अशा परिस्थिती शेतकरी राजा कसा पोट भरू शकतो म्हणुन मायबाप सरकार दोन्ही सहयोगी आमदार यांनी कटाक्ष लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button