वैजापूर आदिवासी आश्रम शाळेतील दूषित पाण्यामुळे सात आदिवासी विद्यार्थिनी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल
प्रकल्प अधिकारी यांनी नेहमी प्रमाणे भ्रमणध्वनी न उचलल्यामुळे प्रश्न चिन्ह कायम….
चोपडा(प्रतिनिधी):- चोपडा तालुक्यातील वैजापूर आश्रम शाळेतील सात विद्यार्थिनीची दूषित पाणी पिल्यामुळे तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .
वैजापूर येथील आदिवासी मुलींची आश्रम शाळेतल्या मनीषा पावरा वय१०,रतीला बारेला वय०५,रोशनी बारेला वय १०,पूजा बारेला वय१५,मोनिका पावरा वय१८,रविना पावरा वय१७,संगीता भिलाल वय१८या सात विद्यार्थिनीची तब्येत बिघडल्या मूळे त्यांना वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तिथे डॉकटर उपलब्ध नसल्यामुळे चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात एम्बुलस द्वारे संध्याकाळी सात वाजता दाखल करण्यात आले या बाबत आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विकास माळी यांच्याशी फोन वर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की १७जून पासून शाळेतील पाण्याची बोर बंद पडली आहे.बोअरवेल दुरुस्ती करिता २०हजार रुपये खर्च करून पण बोर सुरू न झाल्यामुळे शाळेला टॅंकर द्वारे पाणी पूरोठा करण्यात येत आहे वस्तिग्रह अधीक्षक ह्या दोन दिवसापासून शासकीय कामाकरीता यावल प्रकल्प कार्यालयात गेल्या असल्या कारणाने त्यांना शाळेतील शिक्षकांनी व कर्मचारी यांनी रुग्णालयात दाखल केले प्रकल्प कर्यालाचा मीटिंग मध्ये विषय मांडून सुद्धा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले .नेहमी प्रमाणे प्रकल्प अधिकारी यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही त्यामुळे त्यांचे मत यावर कळू शकले नाही.








