Nashik

अतिवृष्टी मुळे निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावे मनसे ची मागणी.

अतिवृष्टी मुळे निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावे मनसे ची मागणी

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:निफाड तालुक्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पिकांचे मोठे नुकसान झालेले असून तालुक्यातील काढायला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .तसेच कांदा शेतात पाणी साचल्याने कांदा सडला आहे. तर भुईमूग व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे.

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी निवेदना मार्फत तहसीलदार साहेब यांना करण्यात आली यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शैलेश शेलार ,तालुकाउपाध्यक्ष केशव काका वाघ, उगाव गट अध्यक्ष प्रमोद भाऊ मापारी, मनविसे तालुकासरचिटणीस संग्राम दाभाडे, अनिल वाघ,ता चिटणीस जयेश ढिकले, संदीप दराडे, अप्पा व्यवहारे,आदित्य कहाने आनंदा नागरे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button