चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आजचे शिक्षणामधील पालक आपल्या पाल्यांचे करियर निवडतांना हे त्यांच्या मनाप्रमाणे न निवडता आपल्या इच्छेचे ओझे मुलांवर लादतात तस न करता मुलांच्या इच्छेनुसार त्यांचे करियर निवडू द्या असे मत गटशिक्षणधिकारी डॉ.भावना भोसले यांनी मुन्सिपल शाळा येथे जळगांव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतपेढी शाखा चोपडा तर्फे झालेल्या सभासद पाल्याचा गुणगौरव सोहळा वेळी काढले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्यिक परिषद चे ए.एन.सोनवणे सर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणधिकारी डॉ.भावना भोसले शिक्षणविस्तारधिकारी सुधाकर गजरे ग.स.सोसायटी माजी संचालक रमेश शिंदे,आर.एच बाविस्कर, संचालक देवेंद्र पाटील,माजी तज्ञ संचालक मंगेश भोईटे पारोळा पतपेढी चे माजी अध्यक्ष अनिल पाटील होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलाने झाली.यावेळी इ.१० वी.१२ वी तसेच वेगवेगळ्या परिक्षेत नाविन्य पूर्ण गुणवत्ता मिळालेल्या पाल्याना स्मृतिचिन्ह रोख रक्कम गुलाब पुष्प देऊन सत्कार आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गट शिक्षणधिकारी डॉ.भावना भोसले यांनी आलेल्या पालकांना व पाल्यांना म्हणतांना सांगितले की हा गुणगौरव सोहळा हा गुणवंत पाल्यासोबत घडवणाऱ्या पालकांचा आहे .तसेच बाहेर शिक्षण घेतांना मुलांनी आपल्याला अडचणी पालकांना सांगायला हवे पालकांनी पण अडचणी बद्दल सकारात्मक भूमिका ठेवून आपल्या मुलांसोबत मित्र म्हणून रहा असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एन.सोनवणे सर म्हणाले कि पालकांनी आपल्या मुलांना जागरुक पणे घडवलेले असतात पालक मुलांना जाणीवपूर्वक घडवून शिल्पकार होतात मुलांनी पण इतर गोष्टी कडे लक्ष न देता आपल्या ध्येया कडे लक्ष केंद्रित करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी केंद्रप्रमुख युवराज पाटील यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक देवेंद्र पाटील तर सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग.स.सोसायटी चे कर्मचारी अशोक पाटील,आनंद बोरसे,दिलीप सपकाळे,नारायण शिरसाठ यासह शाखेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







