चोपडा–
अमृतराज सचदेवा प्रमाणे मी देखील जळगाव जिल्हा नव्हे तर राज्यातील व्यापारी बांधवांच्या समस्या साठी केव्हाही तुमच्यासोबत आहे.
जीएसटी हा आज मोठा बदल वाटत असले तरी येणाऱ्या दिवसात येणाऱ्या पिढीला त्याचा निश्चित मोठा फायदा होणार आहे.जळगाव जिल्हयाच्या व्यापाऱ्यांच्या समस्या साठी केव्हाही हाक मारा मी तयार आहे.वैद्यकीय सेवेत मोठं काम करता येईल,यासाठी व्यापारी बांधवाना जळगावात वैद्यकीय बाबत केव्हाही संपर्क करा असे आवाहन ना. गुरुमुख जगवानी यांनी वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलताना सागितले.
आज चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या वतीने अध्यक्ष अमृतराज सचदेव याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंधी साहित्य अकादमीचे महाराष्ट्राचे कार्यध्यक्ष ना गुरुमुख जगवानी याच्या हस्ते चोपडा औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव,जळगाव महानगरपालिका नगरसेवक मनोज आहुजा,प्रसिध्द व्यापारी बण्णाराम शामनानी,चोपडा नगरपालिका गटनेते जीवन चौधरी,एमआयडीसीचे चेअरमन अनिलकुमार शर्मा,व्हाईस चेअरमन महेंद्र सोनार,प स सभापती आत्मराम म्हाळके,बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील,व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष संजय श्रावगी,सुनील बरडीया,राजेंद्र जैन,नरेंद्र तोतला,अनिल वानखेडे,प्रवीण पाटील,सनी सचदेव,श्याम सोनार,संजय शर्मा,अनिल अग्रवाल,मनोज सचदेव,श्यामसिंग परदेशी,प्रवीण जैन,जितेंद्र बोथरा,गोपाल पाटील,कमलेश जैन,नितीन अहिरराव,पप्पू स्वामी,रवी अंदानी आदी असंख्य व्यापारी हजर होते.
**यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी आपल्या मनोगतात सागितले की
जळगाव जिल्हा नव्हे तर खान्देशात मध्ये कोणत्याही व्यापारी बांधवाना अडचणी आल्या तर त्यांनी चोपडा तालुका व्यापारी महामंडळाला संपर्क करावा असे आवाहन अमृतराज सचदेव यांनी केले.यावर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने व्यापारी बांधव चोपडा शहर व तालुक्यात एक हजार वृक्ष जगविणार आहेत त्यांची चांगली सुरुवात झाली असून वरूनराज्याने देखील आज तालुक्यावर मेहरबानी केल्याचे अमृतराज सचदेव यांनी सांगितले.
यावेळी कर्यक्रमाचे सूत्रसंचलन सुशील टाटीया यांनी केले.







