Faijpur

कार्यसंस्कृती चा दर्जा उंचावण्यासाठी महाविद्यालयात एकत्र वाढदिवस साजरा

कार्यसंस्कृती चा दर्जा उंचावण्यासाठी महाविद्यालयात
एकत्र वाढदिवस साजरा

सलीम पिंजारी फैजपूर

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात प्रशासन व कर्मचारी यांच्यातील समन्वय वृद्धिंगत व्हावा, कार्यसंस्कृती उच्चतम दर्जाची असावी व खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांच्या सहकार्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उभारी घ्यावी अशा उदात्त हेतूने प्रेरित होऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांच्या अभिनव संकल्पनेतून महाविद्यालयात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो.

आज लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत व श्री शेखर भालेराव यांचा वाढदिवस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौधरी यांच्या शुभहस्ते बुके देऊन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल सरोदे, श्री राजेंद्र तायडे, आर एस सावकारे, नितीन सपकाळे, सिद्धार्थ तायडे, प्रमोद अजलसोंडे, रवी पाटील कैलास चंदनशिव, चेतन इंगळे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, प्रेम, सहकार्य यामुळे अशक्यातली अशक्य कामे सहज शक्य होत असतात. महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रात नवनवी आयामे गाठली आहेत. यासोबत NAAC प्रमाणित अ (3.24 सी जी पी ए ) श्रेणी प्राप्त महाविद्यालय, आय एस ओ मानांकित उत्कृष्ट धोरण राबवणारे महाविद्यालय असून अध्ययन- अध्यापना सोबतच क्रीडा, कला व सांस्कृतिक, एन एस एस, एन सी सी, कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक तसेच विविध शैक्षणिक व शैक्षणिक पूरक उपक्रमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालय अग्रेसर असते. यापुढेही असाच उपक्रम सुरू राहावा अशी सार्थ अपेक्षा प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी व्यक्त केली. अशा स्तुत्य उपक्रमास तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरिषदादा मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंदबापू वाघुळदे, प्रशासनातील सहकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते. या उपक्रमाचे विद्यापीठ परिक्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button