चोपडा: प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील तालुका व्यापारी महामंडळाचा पदग्रहण समारंभ मोठ्या दिमाखदार समारंभात पार पडला. नवनिर्वाचित अध्यक्ष अमृतराज सचदेव व कार्याध्यक्ष पदी सुशिल टाटिया यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. संस्थेचे अध्यक्ष सचदेव यांनी व्यापारात राजकारण आणि राजकारणाचा कधी व्यापार केला नाही म्हणून ते सर्वमान्य असल्याचे प्रा.अरुणभाई यांनी पूढे म्हटले.
कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार द्वय कैलास पाटील, जगदीश वळवी, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, प्रा.शांतीलाल बोथरा, चंद्रहास गुजराथी, प्रभाकरआप्पा सोनवणे, डॉ सुनील देशपांडे, आबा देशमुख, विकास पाटील, राजेंद्र पाटील, डाॅ महेंद्र पाटील, गजेंद्र जैस्वाल, राजु शर्मा, मनोजआप्पा आहुजा, जीवन चौधरी आदी राजकीय सामाजिक नेते व अनेक मान्यवर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मंडळाच्या उपाध्यक्ष पदी संजय श्रावगी व सुनिल बरडिया, सचिव पदी राजेंद्र जैन व नरेंद्र तोतला, सहसचिव पदी नंदलाल अग्रवाल व शाम सोनार, प्रसिद्धी प्रमुख प्रविण पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्व श्री सुकलाल जैन, चंदुलाल पालीवाल, अनिल वानखेडे, माणकलाल चोपडा व संजय कानडे यांनी तर उर्वरीत ५० संचालकांनी पदभार स्विकारला.
याप्रसंगी वृक्ष संवर्धन मोहिमेचा शुभारंभ उपस्थित अधिकारी वर्ग राजेंद्र रायसिंग, शामकांत सोमवंशी, विनायक लोकरे, भिमराव नांदूरकर, सुनील नंदवालकर, उपजिल्हाधिकारी एतबार तडवी, तहसीलदार दिपक गिरासे, सुवर्णा महाजन, सी.डी.पालीवाल आर्दींच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. पिंपळ, वड, उंबर, लिंब सारख्या रोपांचे अधिकाधिक वृक्षारोपण करून संगोपन व संवर्धनाची जबाबदारी व्यापाऱ्यांनी उचलली आहे.
तालुक्याभरातील अत्यंत गरीब होतकरू विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार शालेय साहित्य वाटप रोटरँक्ट क्लब ऑफ चोपडा च्या वतीने करण्यात आले.
क्लब चे अध्यक्ष डॉ ललित चौधरी, सेक्रेटरी प्रणय टाटिया तसेच त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा ऑपरेशन व्यापारी महामंडळाच्या शिफारशी वर नेत्रज्योती हाॅस्पीटल, जळगांव येथे मोफत केले जाणार असल्याचे यावेळी ना.गुरुमुख जगवानी यांचे वतीने घोषित करण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या निवारणासाठी “टीम 3C” चे गठन करण्यात आले असून ही टीम तत्काळ मदतीसाठी सदैव तत्पर असणार आहे. मंडळ कामकाजाचा आढावा घेणारी कार्यपुस्तिका “अवलोकन” चे प्रकाशन यावेळी अरुणभाईंच्या हस्ते करण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा सुवासिनींच्या हस्ते औक्षण व गुळ भरवून साजरा करण्यात आला. कार्याध्यक्ष सुशिल टाटिया यांचे हस्ते पुणेरी पगडी व भगवा पटका घालून मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक संस्थांच्या वतीने देखील त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलहार-गुच्छ ऐवजी तुळस व इतर रोपांचा वापर करण्यात येऊन एक सुंदर पायंडा पाडण्यात आला.
समारंभ यशस्वीतेसाठी सर्व श्री प्रफुल्ल स्वामी, नितीन जैन, नितीन अहिरराव, मनोज सचदेव, विपिन जैन, प्रविण जैन, शाम परदेशी, सनी सचदेव, रवि अंदानी, दिपक राखेचा, अकरम तेली, चेतन टाटिया आदिंनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणकभाई चोपडा, आभार प्रदर्शन प्रविण पाटील तर सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सुशिल टाटिया यांनी केले.







