Maharashtra

अमळनेर नगरपरीदेषतील आरोग्य विभागातील 3 कर्मचारी निलंबित तर एकास कारणे दाखवा नोटीस….मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची कार्यवाही

अमळनेर नगरपरीषदेतील आरोग्य विभागातील 3 कर्मचारी निलंबित तर एकास कारणे दाखवा नोटीस….मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची कार्यवाही

अमळनेर नगरपरीदेषतील आरोग्य विभागातील 3 कर्मचारी निलंबित तर एकास कारणे दाखवा नोटीस....मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची कार्यवाही

अमळनेर
अमळनेर नगरपरिषदेतील आरोग्य विभागातील 3 कर्मचाऱ्यांना आज मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी निलंबित केले तर एकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  शहरातील प्रभागनिहाय हगणदारी मुक्तीची जबाबदारी दिली असतानाही कामावर हजर न राहणे, कार्यालयात उशिरा येणे सूचनांचे पालक न करणे इ बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तन केल्या प्रकरणी तसेच हे तिन्ही कर्मचारी ओडीएफ करीता फेरतपासणीसाठी आलेल्या क्यूसी आय स्पॉट व्हिजीटप्रसंगीही उपस्थित नसल्याचे आढळून  आले होते.  निलंबित करण्यात आलेल्या मुकादममध्ये फारूख शेख अन्वर, अनिल वामन रामराजे, राजू ओंकार संदानशिव आणि कारणे दाखवा नोटिसमध्ये सत्यन रा. संदानशिव या मुकादमांचा समावेश आहे.
अमळनेर शहर हगणदारीमुक्त झाले आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओडीएफ करीता फेरतपासणीसाठी क्यूसीआय पथक २९ आणि ३० जुलै रोजी केंद्राचे ओडीएफ पथक शहरातील विविध भागात तपासणीसाठी आले होते. त्यासाठी मुकादम शेख यांना सफाई कामगारासह बोरीनदीच्या पात्रात गुड मॉर्निंग पथका सह बोरीनदीच्या पात्रात कामगारांसह हजर राहण्याचे आदेश दिले होते. हा परिसर ओडीएफ स्पॉट असल्याने उघडयावर कोणीही नागरीक शौचास बसणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाब दारी दिली होती. २९ रोजी ओडीएफ तपासणी पथक शहरात आले असताना सूचना देऊनही ते बोरीपात्रात स्वतः हजर राहिले नाही. केवळ कामगार त्याठिकाणी हजर होते. पथक हे रात्री ८:०० वाजे पर्यत पानखिडकी बोरी नदी परिसरातील पाहणी करीत होते. त्यावेळेसही कामावर हजर राहिले नाहीत. तसेच ३० रोजी पथकाने सकाळी ठिक.४:४५ वाजता बोरीनदी संत सखाराम महाराज समाधी पासून ते कृषिभूषण मार्गापर्यंत बोरीनदीचा संपूर्ण परिसराची पहाणी केली त्यावेळेसही कामावर हजर राहिले नाही. याशिवाय न. प. आरोग्य विभागाच्या कार्यालयात उशिराने येणे सकाळी सहा वाजेनंतर हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करून परस्पर प्रभागात निघून जाणे. इ कारणांसाठी निलंबित करण्यात आले आहे .
तर प्रभाग क्रमांक २ व ३ चे मुकादम अनिल वामन रामराजे यांच्या वर सिंधी कॉलनीचा संपूर्ण परिसर, तसेच प्रभाग क्र.०३ मधील शनिपेठ, ताडेपुरा, पारोळा, वगैरे भागाची जबाबदारी दिली आहे. त्यांनाही पथक हे चोपडा रोड भागात पाहणीकरीता येणार असल्या ने सकाळी ठिक, ५:०० वाजता हजर राहाण्याचे सूचित केले होते. पथक सकाळी ठिक. ५:१५ वाजता आल्यावर रामराजे हे हजर नव्हते. त्यामुळे कामात अक्षम्य कसुरी व आदेशाचा अवमान आणि वरीष्ठांशी उध्दटपणे शब्द प्रयोग केल्याने तसेच प्रभाग १० चे मुकादम राजू ओंकार संदानशिव यांनाही दिलेल्या प्रभागात पथकाने तपासणी केली. तेही दिलेल्या सूचनांनुसार उपस्थित राहिले नाहीत. म्हणून त्यांनाही निलंबित  करण्यात आले आहे.
सत्येन रा.संदानशिव यांच्यावर प्रभाग क्रमांक २ ची जबाबदारी दिली आहे.त्यांना दोन दिवसात खुलासा करा अन्यथा कार्यवाही होणार अशी सूचना दिल्या आहेत. म तेदेखील  सकाळी ६:०० वाजता कामावर  हजर नसतात.यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे
आरोग्य विभागात बऱयाच अंशी बेशिस्त, बेजबाबदार, उद्धट कर्मचारी आहेत . काही सफाई कामगार कामावरुन परस्पर गैरहजर असतात, त्या बाबत गैरहजर असले कामगारांचे खाडे मांडता येत नाही. स्वच्छ भारत अभियांनातर्गत अमळनेर शहर कचरामुक्त बाबत पथक शहराची पहाणीसाठी येणार असल्याने वॉर्डातील नागरीक हे ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत देत आहेत किंवा नाहीत, याबाबत खात्री करीत नाही. त्यामुळे नपाची नोकरी इमाने इतबारे करावयाची नाही,असे एकूण चित्र आहे. यापुढे बेशिस्त कारभार सहन केला जाणार नाही त्वरित कार्यालयीन कार्यवाही करण्यात येईल असा इशारही मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button