अजून सहा गावात होणार ग्रा प च्या नवीन इमारती
अमळनेर
तालुक्यातील दोधवद येथे अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत व संरक्षक भितींचे थाटात भूमिपूजन आ शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आ चौधरींच्या प्रयत्नाने मतदार संघातील अनेक गावांत नव्या अत्याधुनिक ग्रा प इमारतींचे निर्माण झाले असताना दोधवतसह अजून सहा गावात ग्रा प च्या नव्या इमारतींचे निर्माण होणार आहे.
दोधवद येथे आ शिरीष चौधरी यांचे उस्फुर्त स्वागत होऊन ग्रा प साठी नवी अत्याधुनिक इमारत आणि आवश्यक असलेली संरक्षण भिंत मंजूर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच साहेबराव बुधाजी भोई, मा. जिल्हा परिषद सदस्य ऍड व्ही आर पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप भोई, निलेश धनगर, साहेबराव साळुखे, मच्छिंद्र भोई, शांताराम भिल, रमेश पाटील, हरिकृष्ण पाटील, अजीज खाटीक, स्वप्नील पाटील, यशवंत पाटील, सुभाष कोळी, पितांबर भोई, सुरेश भोई,ज्ञानेश्वर राजपूत, दिलीप ढोले,
मधुकर भोई, दीपक भोई, गंभीर सैदाने, अविनाश सैदाने, संजय भिल, मंगेश भिल, राजेंद्र भिल,यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.गावाच्या ज्या ज्या समस्या असतील त्या हक्काने सांगा त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी माझी असेल अशी ग्वाही आमदारांनी ग्रामस्थांना दिली.
अजून या गावात होणार ग्रा. प. च्या नव्या इमारती
अमळनेर मतदार संघात आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून नवीन सात ग्रा प इमारतींना मंजुरी मिळाली असून यात दोधवत सह हिरापूर,भोलाने,सुमठाणे, खापरखेडा,झाडी,कलाली,आदी गावांचा समावेश आहे.







