Maharashtra

अल्पवयीन मुलगी व तिच्या सोबतचा अल्पवयीन मुलगा पिंपरी चिंचवड – पुणे येथून ताब्यात… जळगांव आणि पाचोरा पोलीस यशस्वी

 अल्पवयीन मुलगी व तिच्या सोबतचा अल्पवयीन मुलगा पिंपरी चिंचवड – पुणे येथून ताब्यात… जळगांव आणि पाचोरा  पोलीस यशस्वी 

अल्पवयीन मुलगी व तिच्या सोबतचा अल्पवयीन मुलगा पिंपरी चिंचवड - पुणे येथून ताब्यात... जळगांव आणि पाचोरा पोलीस यशस्वी

 जळगांव प्रतिनिधी 
२७/०७/२०१९ रोजी सायंकाळी  ०५:३० वाजेच्या सुमारास १५ वर्ष वय असलेली अल्पवयीन मुलगी पाचोरा येथे दवाखान्यात जाऊन येते म्हणून गेली होती . त्या नंतर ती घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले म्हणून पिंपळगाव (हरे ) पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . ५६/२०१९ भा द वि क . ३६३ अन्वये दिनांक :- २८/०७/२०१९ रोजी गुन्हा दाखल केलं होता . 
सदर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ . श्री . पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक श्री . सचिन गोरे  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  श्री . बापू रोहम व सहायक पोलीस निरीक्षक श्री . रवींद्र बागुल यांना  सूचना व मार्गदर्शन केले होते .
 त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक  श्री . बापू रोहम व सहायक पोलीस निरीक्षक श्री . रवींद्र बागुल यांनी पिंपळगाव (हरे ) पोलीस स्टेशन कडील  पोना . राकेश खोंडे , महिला पो कॉ . सविता ठाकरे , शिवनारायण देशमुख   तसेच  व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ विजय पाटिल , नरेंद्र वारुळे , दिनेश बडगुजर यांना पुणे येथे रवाना केले होते . 
सदर पथकाने पाचोरा , औरंगाबाद , पुणे येथे सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता, सदर प्रकरणातील अल्पवयीन मुलगी व मुलीचा सोबत असलेल्या अल्पवयीन मुलगा हे मुलाचे बहिणीकडे पिंपरी चिंचवड – पुणे येथे मिळून आल्याने आज रोजी अल्पवयीन मुलगी व तिच्या सोबतचा अल्पवयीन मुलगा यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button