चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
जैन अल्पसंख्याक महासंघ, चोपडा सिटी फौंडेशन व चोपडा तालुका मेडिकल असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोल्हापूरच्या पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उदात्त उद्देशाने उद्या दी.११/८/२०१९ रविवारी सायं ४ वाजता गोल मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे आजाद चौक पर्यंत *”पूरग्रस्त मदत फेरी”* चे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे आणि सढळ हाताने जास्तीत जास्त रोख स्वरूपात मदत करावी असे आवाहन आयोजकां तर्फे जैन महासंघ शाखा अध्यक्ष तेजस जैन, सचिव प्रणय टाटिया, उपाध्यक्ष मयूर चोपडा; चोपडा सिटी फौंडेशनचे मार्गदर्शक डॉ विकास हरताळकर, अध्यक्ष अजय पालीवाल, सेक्रेटरी जितेंद्र विसपुते, संजय श्रावगी; तालुका मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष दिपक पाटील, सेक्रेटरी प्रविण मिस्त्री यांनी केले आहे.
फेरीच्या माध्यमातून एकत्रित निधी तत्काळ उपयोगी पडावा या साठी फेरी पूर्ण होताच *अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी* यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मदतकार्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सुशिल टाटिया, नेमिचंद जैन, नितीन जैन, विनोद बी.टाटिया, संदेश जैन, राजेंद्र आर.जैन, सुनिल बरडिया, अशोक जैन, मनोज अग्रवालसर, स्वप्निल महाजन, अविनाश कुळकर्णी आदींनी बोलतांना सांगितले आहे.







