नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांनी आज पदभार स्वीकारला
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. श्री सचिन पाटील यांनी आज दि. २०/०९/२०२० रोजी सकाळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पदाचा कार्यभार स्वीकारला. नाशिकमध्ये सध्या कोरोना वाढता प्रादुर्भाव तसेच मागील काळात सराईत चोरट्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये एटीएम चोर्या तसेच शहरातील वाहतूक ग्रामीण भागातून येणारे मार्केट यार्डातील गर्दी या सर्व गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी विशेष पावले उचलावी लागणार आहे.






