Maharashtra

नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीष चौधरी यांची तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सोबत पाहणी

नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीष चौधरी यांची तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सोबत पाहणी…
तात्काळ पंचनामे नुकसान भरपाई देण्याच्या सूचना

नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीष चौधरी यांची तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सोबत पाहणी

अमळनेर
अमळनेर मतदार संघात तीन दिवस झालेल्या संततधार पावसाने नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीष चौधरी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सोबत पाहणी करून नुकसानीचे तात्काळ  पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या.विशेष म्हणजे कृषी विभागास देखील त्यांनी कामाला लावून पंचनामे करण्यास भाग पाडले.

नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीष चौधरी यांची तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सोबत पाहणी
               तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.मतदार संघातील जळोद, मठगव्हाण, नालखेडा, खापरखेडा, गंगापुरी , दापोरी, मुंगसे, रुढाटी,सावखेडे, धावडे, या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अतीवृष्टीमुळे बिकट परिस्थिती दिसून आल्याने या परिसरात ओला दुष्काळ घोषित करून सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत सूचना आमदारांनी प्रशासनास केल्या.याव्यतिरिक्त जळोद, मठगव्हान, रूढाटी, सावखेडे, पातोंडा याठिकाणी देखील आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.अतिवृष्टीमुळे तालुक्यात 135 घरांची पडझड झाली असल्याने पीडित कुटुंबियांना तात्काळ कशी मदत मिळेल त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या.सदर पाहणी करतांना आमदार शिरीष चौधरी व तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासोबत किरण पवार मठगव्हान, राजेंद्र पाटील,अनिल महाजन, गुलाब आगळे, योगेश पाटील,  तलाठी, शासकीय कर्मचारी, व शेतकरी बांधव उपस्थित होते.दरम्यान आमदार चौधरींनी ग्रामिण जनतेच्या व्यथा जाणून घेत प्रशासनास तात्काळ कार्यवाही करण्यास भाग पाडल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button