_अनोरे गावच्या भगिरथांच्या कष्टाच्या यशाचे श्रेय लाटण्याच्या घाईगर्दीत आमदार ताईनी खोटं बोलण्याची हद्द केलीय राव ….!!!डॉ रवींद्र चौधरी
अमळनेर तालुक्यातील अनोरे गांव… दुष्काळात पाणी टंचाईची झळ सोसत असतांना संदिप पाटिल या तरुणाने जवखेडे गावाचा मागिल वर्षाचा अनुभव पाठी घेऊन अनोरेच्या ग्रामस्थांची जिद्द, चिकाटी आणि उत्साहाच्या सोबतीला उभा ठाकला.सारे गांव एक झाले ,सर्वाना लाजवेल असे कष्ट लहान,थोरांपासून स्रिया-पुरुषांनी,जेष्ठांनी उपसले. बाहेर गावाहून आपल्या गावी येऊन दिड महिना मुक्काम ठोकणाऱ्या लोकांचे कष्ट फळाला आले.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ पोपटराव पवार यांच्यासारख्या परीक्षकांनी टीम गावच्या परीक्षेला येऊन निर्णय देते.आमिर खान,सत्यजित भटकळ,पोळ यासारख्या सामाजिक क्षेत्रात मागिल अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या दिग्गजांच्या “पाणी फाउंडेशन” ने आमदार ताई आपण केलेल्या ना.गिरिषभाऊंच्या तथाकथित फोनवरील वशील्याने निकाल आपल्यामुळे मॅनेज केल्याचा दावा म्हणजे कोणत्याही गोष्टीचा निव्वळ श्रेय लाटण्याच्या सवयीचा उचांक झाला!!!”गिरीष भाऊंच्या फोनने पहिल्या १२ क्रमांकात आणि नंतर ३ रा क्रमांक मिच आणून दिला!”आपल्या अश्या बेताल वक्तव्याने अनोरे च्या शेकडो बालक,विद्यार्थी, महिला,तरुणी,तरुण,जेष्ठ नागरिक , गावाला प्रेरणा देणारे संदिप यांच्या सारखे बाहेरून येऊन निस्वार्थपणे आपले श्रम दान करणारे सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी,अधिकारी यांच्या रात्रंदिवस घेतलेल्या निस्वार्थ कष्टाचे श्रेय घेण्याच्या स्वार्थी सवयीने आपण घोर अपमान केला आहे.*
_*ना.गिरीश भाऊ हे असे तुमच्या सांगण्यावर निकाल मॅनेज करणारे असते तर त्यांनी स्वतःच्या जामनेर तालुक्यातील गावांनाही राज्यस्तरीय यश मिळवून दिले नसते का? इतकंच नाही तर ना.गिरीश भाऊंच्याही कर्तुत्वाला आपण या श्रेयवादात वशिलेबाजीचा डाग लावण्याचे पाप केले आहे!
तालुक्यातील अनोरे सोबत निम, दहिवद,मेहरगाव हि यशस्वी कष्टकरी ,श्रमकरी गावे कुठेही कमी नसतांना त्यांच्या खऱ्या यशावरही तुमच्या या बेताल वशीलाबाजीच्या वक्तव्याने अन्यायच केला आहे!
पाणी फाउंडेशन सारख्या निस्वार्थ, सेवाभावी संस्थेचा अपमान करून लोकांना राजकिय व्यक्तींची किळस येईल असे वक्तव्य केले आहे. पाणी फाउंडेशन हि अराजकीय,अशासकीय अशी सेवाभावी संस्था असून या संस्थेचे काम हे सर्वाधिक पारदर्शक असते तेथे असे राजकीय वशिलेबाजी चालत नाही एवढे तरी आपण ध्यानात घ्यावे…आणि ताईसाहेब स्थानिक कार्यकुशल आमदारांच्या शेकडो कामांचे श्रेय घेऊन आपले मन भरले नाही की काय? म्हणून आता राज्यस्तरावर कष्टसाध्य यश मिळेवणाऱ्या अनोरे गावच्या भगिरथांचे यशाचे श्रेय ही लाटायला मागे पुढे पाहिले नाही वाटतं तुम्ही…!
आमदार ताई…खोटे बोलून इतरांच्या कामाचे श्रेय लाटणे कधी थांबवणार…!







