सर्व सामान्यांचा नशिबी न.पा. च्या कोणत्याही सुविधा नाही.
एम आई एम चे मुख्याधिकारी ला तक्रार निवेदन.
फहिम शेख
नंदुरबार शहरातील विविध मुस्लिम बहुल वस्तीमधील सामान्य नागरिक आपआपल्या परिसरातील नगर पालिकेच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत, ज्या भागातील नगर सेवक प्रभावी आहे त्या भागातील कामे होतात, इतर नगर सेवकाची कामे होत नसल्याचे स्पष्ट मत सामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्तामध्ये व्यक्त करण्यात येत आहे.नंदुरबार शहरात निवडुन आलेले पाच चे पांच मुस्लिम नगर सेवक सत्ताधारी पक्षाचे असुन एक स्वीकृत सदस्य आहे. या सहा पैकी दोन
महिला व चार पुरुष आहेत. सहाजिकच आमच्या त्या नगरसेवकांचा प्रभाव पडत नाही याचे मुख्य कारण भाषेचा अभाव व नगर पालिका अधिनियामांचा अभ्यास. अन्यथा सत्तेत असुनही आपल्या भागात कामे होत नसल्याची इतर दुसरी कारणे काय ?
या परिसरात विकास.. भकास…
नंदुरबार शहरातील सुतार मोहल्ला, काळी मशिद परिसर, इसामू नगर, मच्छी बाजार, कमाई मोहल्ला, रज्जाक पार्क, अली साहब मोहल्ला(अमीन भैय्या कि चाल) तसेच जिल्हा सरकारी अस्पताल समोर असलेली वसाहत(घरकुल) अशा अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये विकासकाम होत नसल्याची तक्रार आहे.
विशेषतः मुस्लिम समाजाचे दफनभूमी म्हणजेच कब्रस्तान येथे कुठलीही सुविधा नाही.
या सुविधा नसल्याने निवेदन…
उपरोक्त वसाहतीमध्ये मुख्य अडचण म्हणजे व्यवस्थित रस्ते नाही, काही मुख्य ठिकाणी रस्ते इतके जीर्ण झाले आहेत कि न.पा. ने त्या ठिकाणी शेती केली तर चांगली उत्पन्न मिळुन जाईल, व्यवस्थित गटारी नाही, मुख्य अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन फार जुनी व फक्त चार इंची असुन पाईप लहान व जीर्ण झाले असल्याने ड्रेनेज ओवरफ्लो होऊन मुख्य रस्त्यावर सांडपाणी येऊन साचतात,
आरोग्यच्या सुविधा नाहीत, अस्वच्छता पसरलेली आहे, कचरा घेण्यासाठी घंटा गाड्या येत नाही, डेगुची साथ सुरु झाल्याने त्वरीत स्वच्छता करण्यात यावी, तसेच मुस्लिम कब्रस्तान हा वर्षानुवर्षांपासून टेकडी खाली असल्याने तेथील उबडखाबड जागेवर प्रेतांची दफन विधी केली जातात, जागा लेवल नसल्याने कबर खोदण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतात, प्रेतांची नमाज पठणसाठी
तिथे ओटा नाही, मुख्य ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही, वाचमेन साठी रूम नाही, रस्ते नाही.
या निधीचा वापर करावा
न.पा. फंडातून, अल्पसंख्यांक निधीतुन अथवा इतर उपलब्ध निधीमधून वरील सुविधा उपलब्ध करून द्यावा व या अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये नागरी सुविधा बाबत त्वरीत कामे हातात घेण्यात यावी अन्यथा न.पा. टॅक्स भरणार नाही व त्रिव स्वरूपाचे आंदोलन करणार. असे त्रिव शब्दात निवेदन देण्यात आले असुन सदर निवेदनाची प्रत खालील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना रवाना करण्यात आली आहे .
१) मा. सैय्यद इम्तियाज जलील साहेब
खासदार व AIMIM महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, औरंगाबाद.
२) मा. आमदार मुफ्ती इस्माईल साहेब
AIMIM गटनेता महाराष्ट्र विधानसभा, मालेगाँव.
३) मा. आमदार डॉ. फारूक शाह साहेब, धुळे शहर.
४) मा. विभागीय आयुक्त साहेब, नाशिक विभाग नाशिक.
५) मा. जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार.






