देवगाव देवळी हायस्कूलमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.
अमळनेर प्रतिनिधी
देवगांव तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये पवित्र्यांचा संस्कार स्नेहाच्या बंधनात बांधणारा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के ,एस के महाजन,एच.ओ. माळी होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन शिक्षक आय .आर. महाजन यांनी केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. व सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक शपथ देण्यात आली बहिण-भावाचे नाते असेच दृढ राहावे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की रक्षाबंधन या स्थानामुळे परिवार एकत्र येतात व सर्वांना एकत्र करणारा एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजात खूप मोठा वाव मिळतो .अशा प्रकारचे संस्था समाजातील प्रकारची एकरूपता, ऐक्य असते. अशाप्रकारे समाज सामर्थ्यशाली बनतो हाच खरा राखी पौर्णिमेचा संदेश आहे असे सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले आभार प्रदर्शन एस. के. महाजन यांनी मानले.








