Maharashtra

एकात्मता माध्यमिक विद्यालय येथे नव उद्योजक योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

एकात्मता माध्यमिक विद्यालय येथे नव उद्योजक योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

एकात्मता माध्यमिक विद्यालय येथे नव उद्योजक योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमळनेर येथिल शहापूर गावांतील एकात्मता माध्यमिक विद्यालय येथे नव उद्योजक योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
           शहापूर येथिल रहिवासी असलेले युवा व्यावसायिक नव उद्योजक म्हणून योगेश पाटील यांनी ओम साई इरिगेशन सिस्टीम च्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.तर पाडळसरे जनआंदोलन समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही ते सक्रिय असतात.नुकतेच त्यांनी कु.धनश्री देसले या मुलीचा एम एस सी स्टॅटिस्टिक करिता उच्चशिक्षणासाठीचा खर्चही उचलून युवा उद्योजकांमध्ये आदर्श निर्माण केला आहे.म्हणून
शहापूर गावांतील एकात्मता माध्यमिक विद्यालयाच्या शाळेतील ध्वजारोहनाचा मान यावेळी शाळेचेच माजी विद्यार्थी असलेले योगेश पाटील यांना देण्यात आला.१५ ऑगस्ट रोजी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात पार पडले.यावेळी मुख्याध्यापक आर.डी. पाटील,ग्रामपंचायत पदाधिकारी ,कर्मचारी ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button