आज स्वातंत्र्यदिनी जि.प. प्राथ. डिजीटल मॉडेल शाळा विरवाडे येथे सेवानिवृत्त मेजर श्री. संग्रामभाऊ कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . शाळेच्या वाद्यवृंद गटाने राष्ट्रगीत व झंडागीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संग्राम कोळी सेवानिवृत्त मेजर व श्री. शशिकांत सैंदाणे , पीएसआय भायखळा पो. स्टेशन लाभले होते. प्रमुख पाहुण्यांचा शाल , गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. श्री. संग्राम कोळी यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. प्रशांत माळके व श्री. शशिकांत सैंदाणे यांचा सत्कार माजी जि. प. सदस्य श्री.धमेंद्र राजपूत यांनी केला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. रमेश कोळी , श्री. अकबर तडवी, श्री. भरत शिरसाठ , श्री. अनिकेत पाटील , श्री. तुषार इखे , श्रीमती अनिता पाटील , श्रीमती मनिषा पाटील , सौ. संगिता भालेराव यांनी परिश्रम घेतले.







