रावेर वाहतूक पोलिसाची बिना मेमोपावती दडांचे पैसे जातात कोणाच्या निधीत ?
विना मास्क सोशल डिस्टन्सिंग च्या नावाखाली करतायेत व्यावसायिक वाहनधारकांची लूट
मुबारक तडवी
रावेर गेल्या सहा महिन्या पासुन सपुर्ण देश हा कोरोना सारख्या जिवघेण्या आजाराशी लढत आहे सर्वत्र लाँकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले जातआहे मात्र याचाच गैरफायदा रावेर पोलिस स्टेशनला कार्यरत वाहतूक पोलिस असलेले *धाडे* नामक या पोलिसांने चागलाच उचलला आहे विना मास्क वाहनधारकांनाअडवून व सोशल डिस्टन्सिंन च्या नावाखाली व्यावसायिक, वाहनधारकाना नियम व कायद्याचा धाक दाखवत खुलेआम रॅगिंग सह लुट करीत आहे मोटारसायकल, रिक्षा याना अडवुन दंडाच्या नावाखाली खुलेआम पाचशे रूपयांची मागणी हे पोलीस दादा करत आहेत जर पैसे दिले नाही तर त्यांना मारहाण करून शिवीगाळ करणे मोटारसायकल जप्त करणे पोलिस स्थानकात बसवून ठेवणे , दंडाचे पैसे घेऊनच गाडी सोडने अशी सुसाट दबंगगिरी या पोलीस दादाने गेल्या सहा महिन्या पासुन सुरू ठेवली आहे या सर्व प्रकरणांची तक्रार होवूनही वरीष्ठाचे कारवाईस हात वर का केले आहेत?
वरिष्ठांनी का दुर्लक्ष केले आहे? वरिष्ठांचे दुर्लक्षामुळेच या पोलिसांला चांगले फावले आहे आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही असे अर्विभावात व बिनदिक्कत पणे सागणार्या या वाहतूक पोलिसांवर वरिष्ठ पोलिस प्रशासन कारवाई करणार का? अशी चर्चा रगली आहे हे महाशय दैनंदिन नवनवीन पराक्रम करतात जर एखादं हात देऊन मोटारसायकल स्वाराने गाडी थाबवली नाही तर त्या चा मागे सिनेस्टाईल पाठलाग करुन मोटारसायकल अडवून दंडात्मक कारवाई केली जाते मात्र अशा वेळी जर दुर्दैवाने त्या वाहनधारकांचा किंवा दुसऱ्या वाहनाचा काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असणार ? गेल्या दोन दिवसा पुर्वी बुर्हानपुर येथील हाँस्पीटल मधे जेवनाचा डबा घेऊन जाणाऱ्या दुचाकी स्वार मुलास अडवुन त्याला पैशाची मागणी केली पैसे नाही असे सांगितले तर त्याला पोलीस स्थानकात दोन तास बसविले व नतर दंडाची रक्कम घेऊन मेमोपावती न देता त्याला सोडले त्या सर्व प्रकरणामुळे खाकी वर्दी तला निस्वार्थ पोलिसांना रावेर पोलिस स्टेशनचा धांडे नामक वाहतुक पोलिस कर्मचारी डागाळण्याचा प्रयत्न व कृत्य करीत असलेल्या या पोलीसावर कारवाई का होत नाही ? जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची अशा कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त व गैरवर्तनामुळे नाचक्की होऊन बदनामी होवू लागली आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे रावेर पोलीस दलातील वाहतूक पोलिस कर्मचार्याच्या या निर्दयी पणामुळे ‘सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला कलंक लागण्याची दाट शक्यता आहे. मोटारसायकल अडवून मेमोपावती न देता वाहनधारकांकडून पैश्यांची वसुली करणाऱ्या या वाहतूक पोलिसावर जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक ,डिवाएसपी फैजपूर रावेर पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक यांनी या निर्दयी,मानवताहीन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे बेशिस्तीपणा व गैरवर्तणूकीची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी मोठा वाघोदा येथील रुग्ण वडीलासह सुज्ञ नागरिकांतून होत आहे.






