Maharashtra

तिरंग्याच्या सन्मानार्थ चाळीसगावकर एकवटले युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित तिरंगा सन्मान यात्रेला प्रचंड प्रतिसाद

तिरंग्याच्या सन्मानार्थ चाळीसगावकर एकवटले

युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित तिरंगा सन्मान यात्रेला प्रचंड प्रतिसाद

तिरंग्याच्या सन्मानार्थ चाळीसगावकर एकवटले युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित तिरंगा सन्मान यात्रेला प्रचंड प्रतिसाद

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव येथे मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा सन्मान यात्रेस शहरातुन   उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात प्रथमच इतक्या मोठ्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने शहर वासीयांकडून ठीकठिकाणी तिरंगा सन्मान यात्रेचे स्वागत करण्यात येत होते, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रेल्वे स्टेशन पासून यात्रा प्रारंभ करण्यात आली. युवानेते मंगेश चव्हाण यांनी पेटती मशाल विद्यार्थ्यांना सोपवून तिरंगा सन्मान यात्रेची सुरुवात केली. सकाळी 10:30 वाजता रेल्वे स्टेशन येथून प्रारंभ झालेल्या यात्रेचा दुपारी साडेतीन वाजता नेताजी पालकर चौकातील शहीद स्मारक येथे समारोप करण्यात आला.
यात्रेमध्ये सहभागी झालेले जळगाव येथील शिवतांडव ढोल पथक यांनी शहरातील नागरिकांचे लक्ष आकर्षित करून घेतले, त्याचप्रमाणे कोल्हापूर रायगड जिल्ह्यातील शिवकालीन साहसी खेळ दाखवणाऱ्या कलावंतांनी देखील आपल्या कलांनी शहरातील नागरिकांचे मन जिंकून घेतले. नंदुरबार येथील आदिवासी बांधवांनी देखील आपल्या आदिवासी नृत्याने लक्ष वेधून घेतले. 
समाजामध्ये देशप्रेमाची भावना, सामाजिक एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी यासारखे उपक्रम होणे आवश्यक असल्याने तिरंगा सन्मान  यात्रेचे आयोजन केले असल्याचे मत युवानेते मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
या रॅलीमध्ये विविध वेशभूषा व देखावे सादर करण्यात आले. त्यात सुरुवातीला भारताचे संविधान , तसेच ज्या महाराष्ट्रातील महामानवांना भारतरत्न मिळाले त्यांचा परिचय व महाराष्ट्रभूषण मिळालेले सन्माननीय व्यक्ती यांचा चित्रमय परिचय देणारा चित्ररथ होता. या चित्ररथा नंतर त्यामागे बग्गी मध्ये भारत मातेचे प्रतिरूप सादर करण्यात आले. यासोबत बग्गीच्या  बाजूला घोड्यांवर दोन मुली हातात तिरंगा घेऊन बसलेल्या होत्या. यापाठोपाठ क्रमाने 5 ट्रॅक्‍टरांवर अनोखे देखावे करण्यात आले होते. त्यात महापुरुषांचा देखावा, क्रांतिकारी महिलांचा देखावा, भारतातील वेगवेगळ्या धार्मिक प्रतीकांचा देखावा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या फाशी चा देखावा करण्यात आलेला होता. तसेच ट्रॅक्टरवर मल्लखांब या विद्येचे चित्तथरारक असे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मर्दानी खेळांच्या माध्यमातून शिवकालीन मर्दानी खेळ जसे  तलवारबाजी, निशानेबाजी असे वेगवेगळे मर्दानी खेळ सादर करण्यात आले. साने गुरुजी विद्यालय व आंबेडकर विद्यालयाचे लेझीम पथकाचाही सहभाग होता. स्त्रियांसंदर्भात, बेटी बचाव बेटी पढाव घोषवाक्य पथक या ठिकाणी होते आणि आदिवासी भागातील लोकनृत्य सादर करणारे एक स्वतंत्र पथक या ठिकाणी सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत होते. गुजरात बॉर्डर वर सादर होणाऱ्या आदिवासींची तसेच प्राण्यांची वेशभूषा घालून ते नृत्य  केले जायचे त्याचाही सहभाग होता.तसेच तहजीब उर्दू हायस्कुल, साने गुरुजी विद्यालय,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग या यात्रेत होता. यावेळी शहरातील अनेक सामाजीक संघटना राजकीय संघटनांचे पदादिकार्यांनी  सहभाग नोंदविला,
ज्येष्ठ नेते वसंतराव चंद्रात्रे, प्रीतमदास रावलानी , नगरसेवक सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे ,बापू अहिरे ,विजयाताई पवार , वैशालीताई पवार, संगीताताई गवळी , माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, माजी पं.स.सदस्य सतीश पाटे, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, नगरसेविका विजया ताई पवार, नगरसेविका संगीता  गवळी , नगरसेविका विजयाताई पवार, श्री.भिकन पवार, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मणबापू  शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, प्रा.सुनील निकम यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           या यात्रेचा समारोपावेळी युवानेते मंगेश चव्हाण यांनी नेताजी चौकातील शाहिद स्मारकात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अत्यंत देखण्या स्वरूपातला हा सोहळा चाळीसगाव वासीयांनी अनुभवला. युवानेते मंगेश चव्हाण यांनी तिरंगा सन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून, भविष्यात तिरंग्याच्या सन्मानार्थ सर्व चाळीसगावकर राष्ट्राला अभिवादन करण्यासाठी अशाच प्रकारे एकवटतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button