चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
शहरातील अरुणनगर भागातील गणपती मंदिरात चोरट्यानी मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे पन्नास हजार लंपास केल्याची घटना दि १८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
दि १८ रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचा दरवाज्याचा कडीकोंडा तोडून मंदिरात असलेल्या दानपेटीचे कुलूप उघडून त्यातील अंदाजित रक्कम पन्नास हजार रु चोरून नेले. ही घटना परिसरातील भाविक सकाळी दर्शनास गेले असता निदर्शनास आली.पण यावेळी दानपेटीत असलेली चिल्लर चोरटे तिथेच सोडून गेलेत विशेष म्हणजे
मंदिरातील गणपतीच्या मूर्तीला असलेल्या चांदीचा मुकुटास मात्र चोरट्यांनी हात लावला नाही.याअगोदर मंदिरात दोन वेळा चोरी झाल्याची घटना घडली आहे.या गणपती मंदिराचे नुकतेच जीर्णोद्धार होऊन जवळच असलेल्या कॉलनीतील अनेक भाविक येथे रोज दर्शनानास येत
असतात.घटनेची माहिती कळताच पोलिसांनी मंदिराची पाहणी करून तिथे आढलेल्या सळई, तोडलेले कुलूप जमा केले असून पुढील तपास योगेश पालवे करीत आहे







