Maharashtra

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथील पांडवकालीन मल्लिकार्जुन (महादेव) यात्रा महोत्सव उत्स्फूर्तपणे संपन्न …

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथील पांडवकालीन मल्लिकार्जुन (महादेव) यात्रा महोत्सव 

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथील पांडवकालीन मल्लिकार्जुन (महादेव) यात्रा महोत्सव उत्स्फूर्तपणे संपन्न ...

उत्स्फूर्तपणे संपन्न …
अहमदनगर प्रतिनिधी सुनिल नजन 

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथील पांडवकालीन मल्लिकार्जुन (महादेव) यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अहमदनगर, बीड,औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रावणात ल्या तिसऱ्या सोमवारी ही यात्रा भरते.हे मल्लिकार्जुन मंदिर अतिशय पौराणिक आहे. महाभारतातील अर्जुनाने प्रत्यक्ष येथे येउन गायांचा सांभाळ केला, येथे गायांचे मोठे गोठे होते म्हणून या गावाला घोटण हे नाव पडले आहे.वर्षभरात महाशिवरात्री, महावीरजयंती,आणि श्रावणी तिसरा सोमवार या तीन दिवसी या देवाची यात्रा भरते. सोमवारी पहाटे तिन वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांनी या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.यात्रा महोत्सवा निमित्त गावात, भजन,किर्तन,रांगोळी, सडा समार्जन, शोभेचे दारुकाम,मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरुन पैलवानांना रोख स्वरूपात बक्षिसे व सन्मानपत्र दिली जातात.असे विविध ऊपक्रम राबविण्यात येतात.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथील पांडवकालीन मल्लिकार्जुन (महादेव) यात्रा महोत्सव उत्स्फूर्तपणे संपन्न ...
या महोत्सवासाठी कुस्ती प्रशिक्षक म्हणून दामू आण्णा घुगे,विठ्ठल मोटकर,नामदेव घुगे,लक्ष्मण टाकळकर, गणेश निकम, संजय मोटकर, महादेव खेडकर, बबनराव खेडकर,प्रकाश घुगे, पिरमहंमद शेख,संजय टाकळकर, महादेव बन यांनी विषेश परिश्रम घेतले. प्रतिनिधी         सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button