चांपा प्रतिनिधी अनिल पवार
येथे महिला ग्रामसभेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला , ग्रामसभेत महिलांना गावाच्या विकासावर चर्चा करण्यात आली .यावेळी मार्गदर्शन करतेवेळी सरपंच अतिश पवार यांनी गावातील महिला संबंधित नावीन्यपूर्ण उपक्रम ची माहिती दिली . यावेळी महिलांनी गावातील महिलांच्या संबंधित अनेक समस्या मांडल्या त्यावर तत्काळ उपाययोजना म्हणून सरपंचाने सर्व महिलांच्या समस्यावर निराकरण करणार असल्याचे सांगितले
.महिलांच्या विकासासाठी महिला बचत गटाला विषेश प्राधान्य देण्यात येईल व गावातील महिलासाठी गावांमध्ये शिलाई मिशन द्वारे शिवणकामाचे ट्रेनिंग ग्रामपंचायत माध्यमातून करणार असल्याचे यावेळी सरपंच यांनी सांगितले.गावातील आरोग्य , स्वच्छता , आदर्श गावाची माहिती दिली .यावेळी गावातील महिलांसाठी विविध योजनाची चर्चा करण्यात आली
.गाव स्वच्छता विषयी महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले .महिला ग्रामसभेत प्रत्येक महिलांना आपल्या अंगणात व आजूबाजूच्या परिसरात वृक्षलागवड करण्यासंबंधित मार्गदर्शन सोबतच सरपंचाच्या हस्ते एक रोपटं देण्यात आले .








