गिरणावरील म्हसवे धरणाचे पाणी भोकरबारी धरणात सोडणार
आ.शिरीष चौधरींच्या मागणीनुसार जलसंपदा मंत्र्यांचे तात्काळ कार्यवाही चे आदेश,अनेक गावांना मिळणार दिलासा
अमळनेर-यंदाच्या पावसाळ्यात कोरड्या राहिलेल्या पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात गिरणा नदीवरील म्हसवे धरणाचे पाणी सोडण्याची मागणी आ.शिरीष चौधरींनी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गिरीश महाजन यांना लेखी पत्रांवये केल्याने मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले असून यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात आ चौधरी यानीं ना.महाजन यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सदर मागणीबाबत निवेदन दिले होते,यात त्यांनी नमूद केले होते की अमळनेर मतदार संघातील सुमारे 42 गावे ही पारोळा तालुक्यात येत असून भोकरबारी धरणावर यातील अनेक गावांच्या पाणी पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत,दुर्दैवाने गेल्या वर्षीही या धरणात जलसाठा नसल्यामुळे संबधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता,त्यात भर म्हणजे या वर्षी देखील भोकरबारी धरणात मृत जलसाठा देखील झालेला नाही , यामुळे संबधित गावांना पाण्याच्या भीषण टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तरी यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून गिरणा नदीवरील म्हसवे धरणातून अतिरिक्त वाहणारे पाणी भोकरबारी धरणात सोडण्यासाठी संबंधित विभागास आदेशीत करावे.अशी मागणी आमदारांनी केली होती.अखेर मंत्री महोदयांना ही मागणी रास्त वाटल्याने त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे.जनतेच्या समस्या स्वतः समजून घेत त्याचे तात्काळ निराकरण करण्याचा मोठा हातखंडा आ.चौधरींचा असल्याने जनता समाधानी असून मतदार संघाचे संकतमोचन म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होत असल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.








