Maharashtra

चोपडा येथे पावसाळी क्रिडा स्पर्धांची सुरवात गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

चोपडा येथे पावसाळी क्रिडा स्पर्धांची सुरवात
गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

चोपडा येथे पावसाळी क्रिडा स्पर्धांची सुरवात गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
    मी येथे फक्त मुलींच्या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून येथे आलेली आहे.खेळ खेळतांना मी फक्त जिंकण्यासाठी खेळणार आहे असं ठरवून खेळा.आणि आयुष्यात सुध्दा जिंकण्यासाठी खेळ खेळला पाहिजे.खेळाळू वृत्ती ठेवली पाहिजे आपण सर्व सावित्री च्या लेकी आहोत,असं कार्यक्रमाच्या उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून  गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले या बोलत होत्या .व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ सुधीर चौधरी हे होते.पुढे त्या म्हणाल्या की खेळाळूनी पंचाचा निर्णयाचा आदर ठेवा. पंचानी देखील कुठलाही भेदभाव न करता निर्णय घ्यावा. 

चोपडा येथे पावसाळी क्रिडा स्पर्धांची सुरवात गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा क्रिडा परिषद जळगाव व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय जळगाव व्दारे स्थानिक लिटल हार्ट इंग्लिश स्कूल आणि बालमोहन प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज  दि. २१ ऑगस्ट ला कबड्डी पावसाळी  तालुका स्तरीय सांघिक व मैदानी क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले .
महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद जळगाव व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय जळगाव व्दारे सन २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात पावसाळी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा मा. जिल्हा क्रिडा अधिकारी जळगाव मा. तालुका क्रिडा अधिकारी चोपडा, गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले व  तालुका क्रिडा समन्वयक राजेंद्र आल्हाट यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण तालुक्या तील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांघिक- कबड्डी, खो – खो, व्हॉलीबाल, फुटबॉल व मैदानी स्पर्धा अश्या एकुण दहा खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्व तालुक्यातील शालेय खेळाडुनी शासना च्या या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या शाळेचे, गावाचे, ग्राम पंचायती चे व तालुक्या चे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावतील या अपेक्षेने तालुका स्तरीय क्रिडा स्पधेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी अमर संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी,सचिव दीपक जोशी ,माजी मुख्याध्यापक तसेच आदर्श शिक्षक दत्तात्रय धनगर,चोपडा तालुका क्रीडा समन्वयक राजेंद्र आल्हाट,मंगेश भोईटे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्वागतगीत स्वराली अँड ग्रूप यांनी सादर केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती पाटील यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button