Maharashtra

लोक संघर्ष मोर्चा चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन व चर्चा

लोक संघर्ष मोर्चा चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन व चर्चा

लोक संघर्ष मोर्चा चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन व चर्चा

दिनांक २४ऑगस्ट रोजी भुसावळ येथे आलेल्या महाजनादेश यात्रेच्या वेळी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्यानं नी मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस साहेबांची भेट घेतली ह्या वेळी१)महाराष्ट्रात १ लाखा पेक्षा जास्त वन जमीन धारक आहेत ज्यांचे दावे मंजूर करत त्यांना वनपट्टे मंजूर झाले आहेत त्यांच्या वर अद्यापही वन विभागाच्या केसेस सुरूच आहेत अश्या सर्व केसेस तात्काळ काढून टाकण्याची मागणी लोक संघर्ष मोर्चाने केली असून मुख्यमंत्री मोहद्यानी त्याला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ह्या केसेस मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे ह्या केसेस मागे घेतल्यास महाराष्ट्रातील १लाख कुटुंबांना त्याचा फायदा होईल
२)मागील वर्षी च्या दुष्काळाचा निधी अद्याप चोपडा,यावल,मुक्ताईनगर व जामनेर तालुक्यातील वन जमीन धारकांना मिळालेला नाही तसेच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील वन जमीन धारकांना ही अद्याप ८०कोटी इतकी  नुकसान भरपाई मिळालेली नाही राज्य सरकार तो निधी तात्काळ देईल व लगेच जिल्ह्यात तो निधी वंनजमिन धारकांना देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मोहद्याणी दिले
भुसावळ येथील दीनदयाळ नगरचे पुनर्वसन, दिप नगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पा मुळे बाधित होणाऱ्या गावांना शेती सुधार योजना व वन कायद्याची अमलबजावणी तसेच तापी नदीतील ५ टीएमसी पाणी उचलण्या बाबत पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन हे लक्ष घालतील व त्या संबंधी ते लवकरच प्रशासन व संघटनेची बैठक बोलवतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले .
महाराष्ट्रातील आदिवासींचे खावटी कर्ज जवळ जवळ ४८० कोटी रुपये शासनाने संघटनेच्या उलगुलान मोर्चाच्या वेळी मागणी केल्या प्रमाणे रद्द केले असून नवीन खावटी कर्ज योजने ऐवजी प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रति माणसी पाच किलो धान्य प्राधान्य क्रमाच्या नुसार दिले जाण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मोहद्यानि दिले.
वन कायद्या बद्दल मुख्यसाचिव लवकरच बैठक बोलावून जनसंघटनाचे मत जाणून घेतील हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले ह्या वेळी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन व जिल्हा पोलिस अधीक्षक श्री उगले साहेब उपस्थित होते तर लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे,सचिन धांडे,चंद्रकांत चौधरी , केशव वाघ,इरफान तडवी,रमेश बारेला, रैना बारेला, वैशाली सोनार ,सीमा चौधरीं हे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button