Nandurbar

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

फहिम शेख

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 17 सप्टेंबर 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button