Maharashtra

सकाळच्या आवाहनाला भागवत कथेतून 5100 रुपये निधी पाडळसरे येथील कथेतून समाजकार्याचा अभिनव उपक्रम

सकाळच्या आवाहनाला भागवत कथेतून 5100 रुपये निधी 

पाडळसरे येथील कथेतून समाजकार्याचा अभिनव उपक्रम

सकाळच्या आवाहनाला भागवत कथेतून 5100 रुपये निधी पाडळसरे येथील कथेतून समाजकार्याचा अभिनव उपक्रम

श्रावण मास निमित्त पाडळसरे ता.अमळनेर  येथे सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथेची सांगता आज महाप्रसाद वाटप करून करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी आपल्या इच्छेनुसार महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे नुकसानग्रस्त कुटुंबियांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन भागवताचार्य रामदेव महाराज यांनी व्यासपीठावरून केले असता झोळी फिरविण्यात आली त्यात उपस्थित महिला व पुरुष भाविकांनी एकूण 5100 रुपये रोख रक्कम या झोळीत टाकली ती एका तांब्याच्या कलशात भरून सकाळ रिलीफ फंडात जमा करण्यासाठी भागवताचे यजमान डिगंबर पाटील,भागवताचार्य रामदेव महाराज,विकास सोसायटी चेअरमन मंगल पाटील,,पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील,पत्रकार वसंतराव पाटील,पत्रकार गजानन पाटील,हेमंत पाटील, मंगल पाटील,
संदीप पाटील, देविदास पाटील , राधेश्याम पाटील,राजेंद्र पाटील, राहुल पाटील, पोलीस पाटील उमाकांत पाटील आदींनी भाविकांकडून झोळी फिरवून भाविकांनी सढळ हस्ते दिलेला 5100 शेकडा रुपये जमा झालेला निधी एका कळसात भरून ” सकाळ रिलीफ फंडात” सुपूर्द करण्यासाठी कळमसरे येथील सकाळचे बातमीदार प्रा. हिरालाल पाटील यांच्या कडे सोपविण्यात आला.

सकाळच्या आवाहनाला भागवत कथेतून 5100 रुपये निधी पाडळसरे येथील कथेतून समाजकार्याचा अभिनव उपक्रम
         तसेच गेल्या आठवड्यात कळमसरे ता. अमळनेर येथील तरुणांनी देखील दहा हजार रुपयांचा मदतनिधी देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
कळमसरे येथे शिव जयंती उत्सव समितीतर्फे ‘मी कळमसरेकर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक मदतीचा हात म्हणून आपण मदत करावी, असे आवाहन त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना केले. या माध्यमातून आज सकाळी दहापर्यंत सुमारे दहा हजार रुपये निधी संकलित झाला. हा मदतनिधी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना सुपूर्द केला.ते देत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार योगेश महाजन,  उमेश काटे, प्रा. हिरालाल पाटील यांच्याकडे त्यांनी हा निधी सुपूर्द केला आहे.या निधी कामी शिव जयंती उत्सव समितीचे योगदान लाभले.
      दरम्यान कळमसरे व पाडळसरे या गावाने दाखवलेल्याऔदार्यतुन पूरग्रस्तांना सुमारे पंधरा हजार रुपयांची मदत होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button