हल्लाबोल करणारे कर्मचारी संस्थेची बदनामी करीत आहेत त्यांच्या विरोधात आमचेही ठिय्या आंदोलन :–प्राचार्य व्ही एन बोरसे
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील श्रीमती. शरचन्द्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी चौकात आज दि 31 रोजी हल्लाबोल आंदोलन केले असून हल्लाबोल करणारे कर्मचारी संस्थेची बदनामी करीत आहेत त्यांच्या विरोधात आमचेही ठिय्या आंदोलन दि 7 रोजी करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एन बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
यावेळी प्राचार्य व्ही एन बोरसे पुढे म्हणाले की,तंत्रनिकेतन महाविद्यालय हे विनाअनुदानित आहे त्यामुळे अडचणी येत आहेत हल्लाबोल करणारे कर्मचारी संस्थेची बदनामी करीत आहेत
ह्या काही निवडक लोकांमुळे युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहे ज्या ज्या ठिकाणी टॅफ नॅप संघटना गेली तेथील महाविद्यालय बंद पडत आहेत.या लोकांनीच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे तक्रारी केल्याने महाविद्यालयाची प्रथम,द्वितीय वर्ष प्रवेश मान्यता काढून घेतल्याने यामुळे 60 कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसला असून त्यांचे संसार उलट उघड्या वर येणार आहेत. शासकीय नियमानुसार वेतन द्यायचे म्हटले तर काय करावे लागते ते त्यांना माहीत नाही काय.?स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देऊन जगापुढे चुकीचा चेहरा मांडत आहेत.यांनी यावर्षी प्रवेश प्रक्रियेत अडथळा आणला म्हणून भरपूर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही हल्लाबोल करणारे कर्मचारी यांची दुटप्पी भूमिका आहे एका बाजूस संस्थेकडून वेतन काढण्याचा प्रयत्न करतात तर दुसऱ्या बाजूस न्यायालयात जातात.संस्थेची आर्थिक स्थिती नसतांना पैसे द्यायचे कुठून.?यातील काही कर्मचारी तर असे आहेत की,काम न करता वेतन लाटले आहे.जिथे काहीच साहित्य, इमारत,सोयी सुविधा नाहीत त्याठिकाणची तंत्रनिकेतन व्यवस्थित सुरू आहेत परंतु चोपडा तंत्रनिकेतन ची भव्य इमारत, सर्व सोयी सुविधा असूनही तक्रार दिल्याने महाविद्यालया पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.यांचाच महाविद्यालय बंद पाडण्याचा डाव आहे.यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय दिलेत.दरवर्षी शासनाकडून स्कॉलरशिप मिळत नसल्याने ती मिळावी यासाठी खंडपीठात याचिका दाखल केली आहे ही बाब न्यायप्रविष्ट आहे असे असूनही वेतनाची मागणी करतात ही चुकीची बाब आहे यावेळी प्रा.एस ई शिसोदे,एन आर शिंदे,एस एस बाविस्कर, प्रणिती चौधरी, विजय चौधरी, एस एम पाटील,प्रमोद देशमुख, मनोज पाटील,संजय पाटील,यशवंत पाटील,कैलास सूर्यवंशी, मनोहर पाटील,जितू चावरे,कपिल कदम,नितीन देशमुख, समाधान पाटील आदी होते.







