चोपडा:-प्रतिनिधी सचिन जयस्वाल
तालुक्यातील अकुलखेडा येथे निकिता दिलीप धनगर (१८) ही तरुणी सकाळी नळाला पाणी आलेलं होतं ते भरून धुनी भांडी करून झाल्यावर घरातील पाण्याची मोटर बंद करायला गेली असता तिथेच तिला शॉक लागल्याने नातेवाईकनी तिला उपचारार्थ चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तिला डॉ,गुरुप्रसाद वाघ यांनी मृत घोषित केले.तिच्या पश्चात आई, वडील दोन बहिणी व ऐक भाऊ होते ती राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी चालक दिलीप धनगर यांची मुलगी होती.पुढील तपास चोपडा शहर पोलिस स्टेशन चे पोलिस नाईक मधुकर पवार करीत आहे







