अंजनगाव सुर्जी मधील श्री विठ्ठल मंदिरा समोर राज्यातील ठाकरे सरकार विरोधात भाजपा चे घंटानाद आंदोलन….
महेंद्र भगत
तालुका प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी :
राज्यातील ठाकरे सरकाने कोरोना विषाणू महामारी मुळे लॉक डाऊन काळात राज्यातील सर्व मंदिर व प्रार्थना स्थळे बंद केले असून आज संपूर्ण राज्यात वाईनशॉप , वाईनबार, भाजीबाजार व इतर मार्केट बाजार पेठा सुरु केल्या असून फक्त मंदिर आणि प्रार्थना स्थळे बंद ठेवली आहेत ती उघडण्यास राज्यातील सरकार ने परवानगी दिली नसून त्याचा निषेधार्थ आज अंजनगाव सुर्जी मधील पुरातन व प्रख्यात असलेल्या श्री विठ्ठल मंदिरा समोर अंजनगाव सुर्जी तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दाळु महाराज व शहर अध्यक्ष जयेशजी पटेल यांच्या नेतृत्वात श्री विठ्ठल मंदिर संस्थान समोर घंटानाद आंदोलन केले.
या वेळी माजी आमदार रमेशजी बुंदिले,तालुका सरचिटणीस संतोषराव काळे, भाष्करराव माकोडे, तालुका उपाध्यक्ष गजाननराव काळमेघ, भाजयूमो अमरावती ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष मनिषजी मेन, माजी भाजयूमो जिल्हा अध्यक्ष विक्रमजी पाठक, भाजयूमो शहराध्यक्ष हर्षलजी पायघन, तालुका सोशल मीडिया प्रमुख भूषण काळमेघ, नंदकिशोरजी चिंचोळकर सह सर्व भाजपा कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
