Nashik

अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम करा कौटुंबिक न्यायालय विधीतज्ञ अॅङ शिरीषभाऊ पाटील यांचे प्रतिपादन

अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम करा कौटुंबिक न्यायालय विधीतज्ञ अॅङ शिरीषभाऊ पाटील यांचे प्रतिपादन

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक्-: अन्यायग्रस्त व्यक्तिवर होणार्या हिंसाचाराविरुध्द जात पात धर्म न बघता केवळ माणूस म्हणून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायग्रस्त व्यक्तीला कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा पुरेपूर उपयोग करावा असे प्रतिपादन विधीतज्ञ व कौटुंबिक न्यायलाचे वकील संघाचे अध्यक्ष अँडव्होकेट.शिरिषभाऊ पाटील यांनी समितिच्या कार्यशाळेत केले.
ही कार्यशाळा रविवार दिनांक.२३ आँगष्ट रोजी विजयगड ओझर येथे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.

मंचावर समितिचे वसंतराव वाघ, रफीक सैयद, तरन्नुम शेख, प्रदीपनाना गांगुर्डे,.वैशालीताई जाधव, टीकुभाई कोहली, राधा क्षीरसागर, मनिषाताई पवार ममताताई पुणेकर आदी.उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजोलन करून छत्रपती शिवाजी महाराज व घटनातज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कररण्यात आले.

या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात व कोविड लाॅकडाऊन कालावधीत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल.अँडव्होकेट शिरिष पाटील, अँडव्होकेट. शरद नवले, सौ.सुनिता जाधव (वानखेडे),.शिवाजीराव गवळी, आदींना समाजभूषण पुरस्कार स्मृतीचिन्ह, शाल गुलाबगुच्छे देऊन सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात रविंद्र दादा जाधव म्हणाले की समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापसात भेदाभेद न करता महीलांसह पुरुष वर्गावरील होणार्या अत्याचाराला प्रतिबंध, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, महीला सबलीकरण, भोंदुबुवाबाबाचा पर्दाफाश, व व्यसनमुक्तीवर भर देवुन समिती मार्फत कार्यकर्त्यांच्या क्षमतांचे सवर्धन आणि पोषक व अनुकूल वातावरण निर्माण करुन संधी उपलब्ध करुन द्यावी .

या वेळी जिल्हा संघटक म्हणून एअरफोर्स सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजीराव गवळी यांची नियुक्ती करण्यात आली तर निफाड तालुकाध्यक्ष शशीभाऊ जाधव, महीला अध्यक्षा शिलाताई जाधव व तालुका कार्ध्याध्यक्षा आशाताई जाधव ,तालुका संघटक प्रकाश गांगुर्डे व सल्लागार.राजेंद्र जाधव यांची नियुक्तीपत्र व ओळखपत्र देवुन निवड करण्यात आली.

तसेच ओझर शहर कार्यकारिणीही जाहिर करण्यात आली. अध्यक्षा रेखाताई धनंजय जाधव, कार्याध्यक्षा शारदाताई भिमराव जाधव, उपाध्यक्षा ताईबाई अशोक पवार,
सरचिटणीस .भारती सुरेश साळवे, चिटणीस सुरेखा बारकु महीरे,
सहचिटणिस चंद्रकला पांडुरंग जाधव, कोषाध्यक्षा शिला संजय केदारे, संघटक सरला देवीदास गवारे, संघटक मंगल मधुकर गायकवाड, सल्लागार बेबी सुरेश आहीरे आदींची नियुक्तीपत्र देवुन निवड करण्यात आली.

अँड.विद्या जाधव, प्रदीप पगारे, दिपक सदाशिव जाधव, संदीप साबळे, उत्तम जाधव, नितिन ढेंगळे, प्रवीण डंबाळे, शब्बीर खाटीक, गोपीनाथ वाघमारे, विजय ढेंगळे, संजय मोहीते, जाफर पठाण, प्रदीप कुमावत, बाबुराव प्रधान, भारत गवई, रविंद्र धिवरे, करण सोनवणे, सुभाष सोनवणे, शशीकांत पवार, कुणाल जाधव, रघुनाथ जगताप,आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफीक सैयद यांनी केले तर शेवटी आभार राजु सोनवणे यांनी मानले स्नेहभोजन व राष्ट्रगिताने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button