राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने कोरोना काळात राज्यघटनेसंबंधी जनजागृती अभियान
सलीम पिंजारी
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या एककामार्फत आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी कोरोना संक्रमण काळातील राज्यघटनेच्या विशेष प्राविधानासंबंधी जनजागृती अभियान यशस्वीपणे संपन्न झाले.
दिनांक 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान केंद्र सरकार च्या वतीने अवेअरनेस ऑन कॉन्स्टिट्यूशन इन कोरोना पेंडमीक अभियान राबविले जात आहे. या अनुषंगाने डी जी एन सी सी, दिल्ली यांच्या आदेशान्वये 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशिल बाबर व धनाजी नाना महाविद्यालया चे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एनसीसी युनिटचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी 45 कॅडेटस सोबत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राज्यघटना विशेष प्राविधान जनजागृती अभियान यशवीपणे राबिवले.
यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व कॅडेटसना एकत्र करून राज्यघटनेच्या सरनाम्याचे जाहीर वाचन करण्यात आले. यासोबत माय गव्हर्नरमेंट ॲप वर असलेली फाईट अगेन्स्ट कोरोना ही शपथ घेतली व जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान जागृती अभियान पोहविण्याची शपथ घेतली या उपक्रमासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार, (रावेर विधानसभा मतदार संघ) मा श्री शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंदबापू वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.






