Bollywood

?️ बॉलिवूड चा परफेक्शनिस्ट अमीर खान कडून एका अभिनेत्रीच्या बाबतीत झाली ही चूक आजही करतोय पच्छाताप….

?️ बॉलिवूड चा परफेक्शनिस्ट अमीर खान कडून एका अभिनेत्रीच्या बाबतीत झाली ही चूक आजही करतोय पच्छाताप….

प्रा जयश्री दाभाडे

बॉलिवूड चा खरा बादशाह,परफेक्शनिस्ट कामात कधीही चुका न करणारा आपल्या चित्रपटातून नेहमीच उत्तम संदेश देऊन सामाजिक बांधिलकी जपत समाज प्रबोधन करणारा बॉलिवूड चा अमीर खान एक उत्तम उत्कृष्ट गुणी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे.अमीर चे चित्रपट बघून सामान्य माणूस आपला जीवनक्रम बदलून टाकतो त्याप्रमाणे जगू लागतो.

भारतात दोनच गोष्टी खूप प्रभावशाली आहेत एक म्हणजे चित्रपट आणि दुसरं म्हणजे क्रिकेट….या दोन्ही गोष्टी भारतीय लोकांच्या मनावर खोल वर परिणाम करतात…त्याप्रमाणे जगतात…अभिनेते आणि क्रिकेट पटूंना डोक्यावर घेतले जाते….

भारतीय चित्रपट सृष्टी तील असे काही चित्रपट आहेत जे लोकांच्या देखील नेहमीच पसंतीला उतरतात. चित्रपटातून मिळालेले चांगले संदेश सर्वासाठी उपयोगी ठरतात. सर्व जण एकमेकांशी चांगले वागू लागतात. चित्रपट देणारे काही ठराविक बॉलीवुड अभिनेते आहेत त्यात अमीर खान हा सर्वात पुढे आहे.

आमिर खान त्याच्या परफेक्शन साठी परिचित आहे.पण त्याच्या कडूनही कळत नकळत चूक झाली होती ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीशी चुकीचे काम केले होते. हे लक्षात आल्यानंतर त्याने त्यासाठी त्या अभिनेत्रीची माफी देखील मागितली होती.

वास्तविक अमीर खान देखील एक माणूस आहे त्याच्या कडून अशी कोणती चूक केली होती की ज्यामुळे त्याला फोनवर राणी मुखर्जी कडे माफी मागावी लागली होती. 1998 ला “गुलाम”हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात आमिर खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात राणी मुखर्जींचा खरा आवाज वापरण्यात आला नव्हता राणीला दुसरा आवाज डब करण्यात आला होता.

गुलाम चित्रपटात राणी मुखर्जीचा आवाज न वापरण्याची आमिर खानची कल्पना होती. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजे 1998 मध्ये करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’या चित्रपटात राणीची मुख्य भूमिका होती.यात राणीचा मूळ आवाजच उपयोगात आणला होता.आमिरने ‘कुछ कुछ होता है’ पाहिला आणि चित्रपटात राणीचा खरा आवाज ऐकला तेव्हा त्याला देखील आश्चर्य वाटले. आणि त्याला पच्छाताप झाला. आमिरने राणीला बोलावून घेतले आणि तिची क्षमा मागितली. आमिरने राणीच्या खऱ्या आवाजावर विश्वास ठेवला नाही ह्या चुकीचा त्याला आजही पच्छाताप होतोय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button