Nashik

कानडी,ता.येवला,जि.नाशिक येथे पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी…

कानडी,ता.येवला,जि.नाशिक येथे पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी…

नाशिक प्रतिनिधी – डॉ .राजेश साळुंके

कानडी ,ता.येवला,जि.नाशिक . पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कानडी गावची आरोग्य तपासणी प्रत्येक घराघरात जाऊन करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका सौ. अर्चना दादा संत ,ग्रामपंचायतीतर्फे शिपाई श्री. सुरेश काळे ,प्राथमिक शिक्षक यांनी प्रत्येक घराघरात जाऊन आरोग्याविषयीची चौकशी केली.सर्दी, ताप ,खोकला व शुगरचे पेशंट चेक करून त्या आजारावर औषध ,गोळ्या देण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले. त्याबद्दल पत्रकार नारायण काळे यांनी सर्व आरोग्य सेवकांचे आभार मानले. कानडी गावात कोणत्याही प्रकारचा आजार रोगाची साथ पसरू नये म्हणून ते आरोग्य सेविका व ग्रामपंचायत शिपाई प्राथमिक शाळेचे शिक्षक स्वतः कष्ट घेऊन गोरगरिबांचे तपासणी चांगल्या प्रकारे करतात . अशीच सेवा चांगल्या प्रकारे आपण करत राहो.अशी आशा सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button