Bollywood

?️ सैफ अली खान चौथ्यांदा होणार पिता…19 वर्षीय मुलगा इब्राहिम खान ने दिली तिखट लाल प्रतिक्रिया…

?️ सैफ अली खान चौथ्यांदा होणार पिता…19 वर्षीय मुलगा इब्राहिम खान ने दिली तिखट लाल प्रतिक्रिया…

मुंबई पी व्ही आनंद

सध्या बॉलिवूड मध्ये करीना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सुरू आहे.आणि या गोष्टीला सैफ करिनाने अधिकृत रित्या जाहीर केले आहे.सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केले. लग्नाच्या चार वर्षानंतर 2016 मध्ये त्यांचा मुलगा तैमूर अली खानचा जन्म झाला.आणि आता सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या घरी आणखी एक छोटा पाहुणा येत असल्याची माहिती मिळाली आहे. 12 ऑगस्ट 2020 रोजी करीना कपूर खानच्या प्रेग्नन्सीची बातमी सर्वात प्रथम आली आणि त्यानंतर सैफ आणि करीनाचे अभिनंदन सर्वत्र केले जात आहे.

या शुभेच्छांमध्ये सैफचा मोठा मुलगा 19 वर्षीय इब्राहिम अली खाननेही आपली प्रतिक्रिया दिली.त्यात त्याने लाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सैफची बहीण सोहा अली खानने त्याचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने द गॉडफादर (The godfather) ऐवजी द क्वाड-फादर (The Quadfather) असे लिहिलेले होते, कारण सैफ आता 4 मुलांचा पिता होणार आहे.आणि सोहाने करिनाचेही अभिनंदन केले आणि सुरक्षित आणि शांत राहण्यास सांगितले आहे. सोहाच्या या पोस्टवर, इब्राहिम अली खानने ने प्रतिक्रिया व्यक्त करत अब्बा असे लिहून पुढे एक आगीचा इमोटिकॉन (emoji) टाकला आहे.

सैफच्या पीआर टीमने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,’आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येणार असल्याची घोषणा करून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रेम आणि समर्थनासाठी सर्व शुभेच्छुकांचे आभार.’

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button