मोठा वाघोदा येथील गरोदर माता सकस पोषण आहारापासून वंचितच
गरोदर माता सह पतींची तक्रार चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
मोठा वाघोदा- मुबारक तडवी
शासनाच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार सलग २ ते ३ महिन्यापासून वाटप करण्यात आलेला नसल्याची तक्रार गरोदर महिला वर्गातून होत आहे त्यामुळे गरोदर मातांना सकस पोषण आहारा विनाच राहावे लागत आहे शासनाकडून मटकी गहू तांदूळ तेल तिखट हळद मुंगदाळ या प्रकारचा पोषण आहार पुरवठा करून पुरविला जातो.

मात्र पुरवठा व वाटप करणाऱ्यांकडून सलग दोन ते तीन महिन्यापासून गरोदर मातांना या सकस पोषण आहाराची वाटप करण्यात आली नसल्याची तक्रार मोठा वाघोदा येथील सौ आरती राजेंद्र गवळी या गरोदर मातेने वृत्तपत्र प्रतिनिधींकडे दिलेल्या अर्जाद्वारे केली आहे तसेच शासनाने गरोदर माता यांना पुरवठा केलेला सकस पोषण आहार पुरवठा केला मग तो गेला कुठे? असा सवालही गरोदर महिलेचे पती राजेंद्र गवळी यांनी केलेल्या तक्रार अर्जात नमूद केला आहे तरी गरोदर माता पोषण आहारात अथरा तफर करणाऱ्या दोषीची सखोल चौकशी करून क** कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी दिलेल्या अर्जाद्वारे केली आहे






