Amalner

अमळनेर येथे अवैध वाळु साठ्याचा तहसीलदार यांनी जाहीर केला लिलाव…

अमळनेर येथे अवैध वाळु साठ्याचा तहसीलदार यांनी जाहीर केला लिलाव…

नूरखान

या जाहिरनाम्याच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, मौजे जळोद येथे गावा लगत स्मशानभुमी रस्त्यालगत अवैधरित्या अंदाजे 13 ब्रास वाळु साठा करून ठेवलेला आहे. सदर अनधिकृत वाळुसाठयाचा जाहीर लिलाव दिनांक 11/08/2020, रोजी प्रत्यक्ष स्थळी सकाळी 11:00 वाजता करण्याचे आयोजिले आहे. सदरील सुमारे 13 ब्रास वाळु साठयाच्या लिलावाकामी मा.अप्पर जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडील पत्र क्र.गोणख/ई-कावि/2019/8/26/1635 दिनांक 29/07/2019 अन्वये प्रति ब्रास 3845/- प्रमाणे अपसेट प्राईज निश्चित करण्यात येत आहे.

लिलावाच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे सदर वाळु साठयाचा लिलाव घेण्यास इच्छुक असतील त्या संबंधितांस अपसेट प्राईज च्या 25%
रक्कम अनामत (डिपॉझिट) भरावी लागेल.मंजुर झालेल्या लिलावाची संपुर्ण रक्कम ही मंजुर झालेल्या लिलावाच्या आदेश मिळण्यापूर्वी चलनाव्दारे शासन जमा करावी लागेल तद्नंतर अनधिकृत वाळु साठा संबंधितांच्या ताब्यात देण्यात येईल.सदर वाळू वाहतूक करण्यासाठी वाहनांची सोय करण्याची व मुदतीत वाळु उचल करण्याची
सर्वस्वी जबाबदारी लिलाव घेणाऱ्या संबंधितांची राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button