छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कानडी सरकारचा नाशिक मनसे तर्फे निषेध.
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक:- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती गावात दोन दिवसांपूर्वी तेथील महाराष्ट्रीय जनतेने अखिल महाराष्ट्राचे आध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. परंतु काही तथाकथित स्थानिक संघटनांनी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केल्याने स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथून हटवला.
एकेकाळी शहाजी राजे यांची जागीर असलेल्या बेंगलोर प्रांतातील व छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण विजयात स्वराज्याचा अविभाज्य भाग बनलेल्या या भागात छत्रपतींच्या पुतळ्याची अशी अवमानना करणाऱ्या कर्नाटकातील नतद्रष्ट येडीयुरप्पा सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून आ. राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व ज्येष्ठ मनसे नेते डॉ. प्रदीपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर व शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो व पुतळा दहन आंदोलन करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कानडी सरकारचा निषेध असो !! अशा घोषणा देऊन महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने त्याच जागी बसवला नाही तर उग्र जन आंदोलन छेडण्यात येईल व ह्याची सर्वस्वी जबाबदारी कर्नाटक सरकारची राहील असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला.
या प्रसंगी अजिंक्य बोडके, ललित वाघ, अजिंक्य शिर्के, शंकर कणकुसे, ओमकार पवार, अक्षय माळी, तुषार कदम, संज्योत भाटी, अनिकेत झिटे, अमोल सूर्यवंशी, निखिल बागुल, सदाशिव परब, सचिन काकडे, आकाश शिर्के, अभिषेक बारस्कर इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.






