आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मन्याड धरणाचे जलपूजन चाळीसगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये उत्साहाचे वातावरण
चाळीसगाव प्रतिनिधी नितिन माळे
तालुक्यातील २२ खेड्यांना संजीवनी ठरणारे मन्याड धरण सलग दुसऱ्यावर्षी १०० टक्के भरल्याने आज दि.५ ऑगस्ट रोजी तालुक्याचे आ.मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते धरणाचे विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश तात्या सोनवणे, मार्केट संचालक धर्मा बापू काळे, सायगावचे उपसरपंच नथू अण्णा चौधरी, भाजपा उपाध्यक्ष आबा बछे, पं.स.सदस्य सुनील पाटील, पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील, धनंजय गायकवाड, यांच्यासह उपखेड सरपंच महेश मगर, भाजपा सरचिटणीस अमोल चव्हाण, राजेंद्र पगार, अरुण पाटील, जितु पाटील, दिनेश महाजन, वासुदेव पाटील, नीलकंठ मगर, पिलखोड येथील आबा पाटील, टाकळी प्रदे येथील वाल्मिक जिभाऊ सूर्यवंशी, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, नांद्रे येथील भावडू दादा, शाम पाटील, रमेश पाटील, अलवाडी येथील ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, देशमुखवाडी दिनेश पाटील, माळशेवगे येथील अरुण पाटील, राम पाटील, अंधारी येथील प्रफुल्ल पाटील, पिंप्री येथील शरद पाटील, विलास पाटील व परिसरातील पिलखोड, नांद्रे, टाकळी प्र.दे., सायगाव, मांदुर्ने, उपखेड, पिंप्री, काकळणे, अलवाडी, देशमुखवाडी, तामसवाडी येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी वर्ग उपस्थित होते.
जलपूजनाच्या प्रसंगी बोलताना आ. मंगेश दादा चव्हाण यांनी सांगितले की, मी आमदार झाल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मन्याड धरण भरल्याने वरुणराजाची अशीच कृपादृष्टी आमच्यावर असावी अशी प्रार्थना मी करतो. यावर्षी कोरोना सारखे संकट असताना देखील शेतकऱ्यांमध्ये वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे. तालुक्याचे मोठे अर्थकारण या धरणावर अवलंबून आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी मागील वर्षभरात शक्य ते प्रयत्न केले आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी होताच त्या संदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच मन्याड धरणाच्या ज्या पाटचाऱ्या नादुरुस्त आहेत त्यामुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणात होते व पाण्याच्या आवर्तने कमी करावी लागतात त्यासाठी देखील पत्रव्यवहार केला आहे. या परिसराने मला भरभरून प्रेम दिले आहे, मी सदैव तुमचा ऋणी असेल व तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.






