Rawer

कांडवेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना आ.चंद्रकांत पाटील आले धावून…

कांडवेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना आ.चंद्रकांत पाटील आले धावून…

ता, रावेर विलास ताठे

कांडवेल येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची भेट घेतली असता सदर कांडवेल-चांगदेव शेत रस्त्याची वर्षभरापासून अत्यंत खराब वाईट अवस्था झाली आहे.व मोठं-मोठे पडलेले आहे व केळी इतर माल वाहतूक करण्यास शेतकरी यांना मोठा प्रमाणात त्रास होत आहे.बाबत समस्या मांडली असता तो करून देऊ असा शब्द दिला होता.आज तो कामाच्या स्वरूपातुन खऱ्या अर्थाने पूर्ण होतांना दिसत आहे..व त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना माल वाहतूक करण्यास अडचण येऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आमदार चंदू भाऊंनी त्यांच्या स्वखर्चाने व ट्रॅक्टर च्या साह्याने खडी,गोटे टाकण्यास सुरवात केली.

आ.चंद्रकांत भाऊंच्या मार्गदर्शनाने-जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,राहुल पाटील-उपसरपंच कांडवेल,यांनी स्वतः उभे राहून ट्रॅक्टर च्या साह्याने रस्ता व शेतकरी-देविदास वाघ,शंकर पाटील,जानराव पाटील,युवराज पाचपोळे, रतन पाटील,राजकुमार पाटील,सुभाष पाटील.रेम्भोटा यांच्या उपस्थितीत हे करून घेतला.सर्व गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button