चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरसाठी विधानपरिषद आमदार चंदूभाई पटेल यांच्या निधीतून १० g लाखांची मदत…लोकसहभागातून उभे राहणाऱ्या सुसज्ज कोविड सेंटर चे काम प्रगतीपथावर…आमदार चंदूभाई पटेल व आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी…मनोज भोसलेप्रभू श्रीराम मंदिर भूमिपूजन दिनाच्या पावन पर्वावर दि.५ ऑगस्ट २०२० रोजी कोविड सेंटर चे होणार लोकार्पणचाळीसगाव – तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णांना दर्जेदार सुविधा देत कोरोनाशी लढण्याचा विश्वास देणाऱ्या सुसज्ज अश्या कोविड सेंटरची उभारणी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे. या कोविड सेंटरच्या कामाची पाहणी विधानपरिषद आमदार चंदूभाई पटेल यांनी केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या विनंतीवरून आमदार चंदूभाई पटेल यांनी कोविड सेंटर मधील अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले. यावेळी चाळीसगाव तालुक्याचे तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.पी.बाविस्कर, नायब तहसिलदार विशाल सोनवणे भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, प्रदीप देवरे , सुनील पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर भूमिपूजन दिनाच्या पावन पर्वावर दि.५ ऑगस्ट २०२० रोजी कोविड सेंटर चे लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
लोकसहभागातून तयार होणाऱ्या सुसज्ज अश्या कोविड सेंटरची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार चंदूभाई पटेल यांना दिली. चाळीसगाव येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अनेक पक्ष व संघटनांनी कोविड सेंटर साठी सढळ हाताने मदत जाहीर केली होती. कोरोना काळात आपल्या दातृत्वातून तालुक्यातील जनतेला आधार देणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील पुढाकार घेत जास्तीत जास्त सोयी सुविधा याठिकाणी निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दातृत्ववान व्यक्ती या कार्यासाठी सढळ हाताने मदत करत आहेत.
राजकीय पक्ष – सामाजिक संघटना व दानशूर व्यक्ती यांच्या दातृत्वातून ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर चे काम युद्धपातळीवर सुरू असून नुकताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यानंसह प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला होता. जवळपास १५० बेड, त्यांना ऑक्सिजन व्यवस्था, पूर्ण हॉल ला वातानुकूलित ठेवण्यासाठी एअरकंडिशन, मनोरंजनासाठी एलसीडी टीव्ही, स्वच्छता ठेवण्यासाठी खाजगी एजन्सी तसेच रुग्णांचे कपडे, बेडशीट धुण्यासाठी डिजिटल वाशिंग लाँड्री मशिन अश्या अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहेत. या सर्व सोयी सुविधांची माहिती ऐकून आमदार चंदूभाई पटेल यांनी समाधान व्यक्त केले. पुढील काळात देखील आवश्यकता भासल्यास भरीव मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.कोविड सेंटर ला एलसीडी टीव्ही सुपूर्दकोविड सेंटर मध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे, त्यांना इथे कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. योगा, आरोग्य, मनोरंजन आदींची माहिती रुग्णांना मिळावी यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्वखर्चाने कोविड सेंटर साठी ५ एलसीडी टीव्ही बसविण्यात येणार आहेत. आज आमदार चंदूभाई पटेल यांच्याहस्ते त्यातील २ एलसीडी ह्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. पुढील २ ते ३ दिवसात परिसरात ३ हायमास्ट लॅम्प, आतील हॉलसाठी १४ एअर कंडिशन आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्वखर्चातुन बसविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी दिली.






