India

?️ Big Breaking..उद्या पासून हे होतील मोठे बदल…जन सामान्य जीवनावर होईल परिणाम…

?️ Big Breaking..उद्या पासून हे होतील मोठे बदल…जन सामान्य जीवनावर होईल परिणाम…

प्रा जयश्री दाभाडे
1 ऑगस्ट 2020 पासून जन सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे 6 मोठे बदल होत आहेत. हे बदल बँक खातं, स्वयंपाकाचा गॅसपासून गाडीच्या विम्याच्या हप्त्यांपर्यंत होणार आहेत. त्यामुळे हे बदल आणि त्याबाबत झालेल्या नियम समजून घेणं महत्वाचं आहे.

  • LPG गॅस च्या किमती वाढणार…

तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG घरगुती गॅस सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या किमतीची घोषणा करतात. 1 ऑगस्टला LPG च्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक झळ सोसण्यासाठी तयार रहावं लागणार आहे.

  • हे असतील बँकांचे नियम

रोख रकमेचा व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँकांनी 1 ऑगस्टपासून ग्राहकांच्या बँक खात्यात कमीत कमी ठेवीवर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. या बँकांमध्ये 3 मोफत व्यवहारांनंतर शुल्क आकारलं जाणार आहे. या शुल्क आकारणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra bank) आणि आरबीएल बँकेचा (RBL Bank) समावेश आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेव्हिंग खातेधारकांना मेट्रो आणि शहरी भागात कमीत कमी 2,000 रुपये ठेव ठेवणं आवश्यक आहे. ही रक्कम आधी 1,500 रुपये होती. या रकमेपेक्षा कमी बॅलन्स असेल तर मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, अर्ध-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात 20 रुपये प्रति महिना शुल्क आकारलं जाणार आहे.

  • कंपनी कोणत्या देशातील आहे हे सांगणे बंधनकारक

ई-कॉमर्स कंपन्यांना (E-commerce companies) 1 ऑगस्टपासून आपल्या उत्पादनाच्या मूळ देशाची माहिती सांगणं आवश्यक असणार आहे. विक्रीसाठीचं उत्पादन कुठं तयार झालं, कुणी बनवलं इत्यादी तपशीलांची माहिती देणं यात अपेक्षित आहे. अनेक कंपन्यांनी याधीच ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

यात फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि स्नॅपडील सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने (DPIIT) सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना 1 ऑगस्टपर्यंत नव्या उत्पादनांची यादी त्यांच्या निर्मिती देशाच्या माहितीसह पाठवण्यास सांगितली आहे. मेक इन इंडिया प्रोडक्टला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

  • पी एम किसान योजना

1 ऑगस्टला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे. 1 ऑगस्टला मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा सहावा हप्ता जमा करेल. सरकारने या योजनेत आतापर्यंत देशातील 9.85 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट आर्थिक लाभ दिला आहे. या योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 ला आला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button