वाटेगाव

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नंतर त्या कुटुंबातून पुन्हा एकदा सुनेचा रशिया प्रवास..

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नंतर त्या कुटुंबातून पुन्हा एकदा सूनेचा रशिया प्रवास..

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नंतर त्या कुटुंबातून पुन्हा एकदा सुनेचा रशिया प्रवास..

सचिन साठे
साहित्यरत्न जन्मभूमी वाटेगाव
अण्णा भाऊंनी रशियाचा प्रवास केल्यानंतर “”माझा रशियाचा प्रवास”” या कादंबरीतून रशियातील अनुभव या कादंबरीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले.आता तो मान पुन्हा एकदा अण्णा भाऊंच्या सून सावित्रीमाई साठे यांना भेटला आहे. 
  गेल्या 35 वर्षांपूर्वी  सावित्रीमाई ना अण्णा भाऊंच्या घरात सून म्हणून जाण्याचा मान मिळाला.
अण्णा भाऊंचे पुत्र मा. मधूकरजी साठे(ज्यांचं 2000 साली निधन झाले.) यांच्याशी विवाह करून सावित्री माईंनी संसाराला सुरवात केली. आपण ज्या घरात सून म्हणुन आलोय ते घर एका महान अशा साहित्यिकांचे घर आहे याची कुठलीही भनक नसलेल्या सवित्रीमाईंनी त्या घरातील गरिबीला, कष्टाला, संघर्षाला, आपलं केलं. गरिबाची मुलगी गरिबाला असच ते लग्न होत.सावित्रीमाई या संघर्षाला तयार होत्या. पूर्वीच्या काळी विजेची व्यवस्था न्हवती, अंधाऱ्या  वाटेतून मार्ग काढत, त्या घरात दिवा पेटता करून, खडतर संसाराची वाट सुरू झाली. प्रचंड दुःख, वेदना यातना, भयानक गरिबी याला न डगमगता रात्र दिवस कष्ट सुरू झाले. गावातील कोणतेही काम असो मग ते घरे सारवणे, धुनी भांडी करणे, शेतात  मोलमजुरी करणे सगळ्या कामात सावित्रीमाई पुढे असायच्या. माझ्या नशिबाला आलेले हे वाईट दिवस म्हणजे माझं नशीबच अशी त्यांची मानसिकता नव्हती तर हे ही दिवस बदलतील अशी प्रचंड इच्छाशक्ती त्यांची असायची, पण वर्षानुवर्षे गेले पण दिवस काही बदलत न्हवते, आणि सवित्रीमाईंचे कष्ट ही थांबत न्हवते. पण दिवस बदलले
अण्णा भाऊंचे एक वाक्य आहे की, “दिवस कधी दारात ठाण मांडून बसत नाहीत”” दिवस निघून जातात. अण्णा भाऊंच्या या संदेशाप्रमाणे खरच दिवस बदलले. सवित्रीमाईंच्या कष्टातून आज हळूहळू चांगले दिवस येत आहे. अण्णा भाऊंच्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत असताना समाज हे सुद्धा आपले कुटुंब आहे. त्याला ही आपल्या कुटुंबाप्रमाणे जपा अस आम्हाला नेहमीच सांगत असतात
 सवित्रीमाईं यांच्याबद्दल लिहण्यासारखं खूप काही आहे, हा 35 वर्षाचा संघर्ष आहे,  यातून त्यांचे गेल्या पस्तीस वर्षांचे दुःख सहज मांडता येणार नाही, आणि ते हा लेख वाचनारालाही जाणवणार नाही , पण मी याचा साक्षीदार आहे,मी हे सगळं डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे मला खूप  आनंद होत आहे. कारण वर्षानुवर्षे दारात ठाण मांडून बसलेल्या दुःखाच्या डोंगराला बाजूला सारून आमची माऊली रशियाला जात आहे.. तिच्या प्रवासाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा . व  रशियातील जन्मशताब्दीच्या निमित्ताने होत असलेल्या परिषदेचे आयोजन करणाऱ्या सर्व कर्मचारी बांधवांना ही खूप खूप शुभेच्छा…

Leave a Reply

Back to top button