Nashik

ऋणानुबंधन पुरुष व महिला हक्क संरक्षण समुपदेशन केंद्र नाशिक यांच्या वतीने पिडित महिलेला न्याय

ऋणानुबंधन पुरुष व महिला हक्क संरक्षण समुपदेशन केंद्र नाशिक यांच्या वतीने पिडित महिलेला न्याय

नाशिक शांताराम दुनबळे नाशिक -:

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे राहणाऱ्या सौ.ज्योती शरद पवार यांच्यावर सावञ सासु दिर व ननंद यांनी अन्याय व अत्याचार करुन तिला मारहाण केली.तिचा शारिरीक व मानसिक छळ करत होते .तीचे लहान तिन मुलांना देखिल या सर्व लोकांनी ञास दिला होता.सौ.ज्योती शरद पवार यांची दुसरी ननंद सौ.सुरेखा दिपक निंभारे यांनी रितसर कोपरगाव येथील पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.तसेच ऋणानुबंधन पुरुष व महिला हक्क संरक्षण समुपदेशन केंद्र नाशिक यांचाकडे न्याय मिळण्यासाठी अर्ज दाखल केला.

या अर्जाची दखल घेऊन ऋणानुबंधन पुरुष व महिला हक्क समितीचे संस्थापक डाॅ.राजेश जे .साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवुन देण्यासाठी कसोटीने प्रयत्न केले.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ.सुचिता साळुंके , महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष निर्भिड़ पञकार शांताराम दुनबळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सौ.राणीताई गांगुर्डे ,नाशिक रोड अध्यक्ष श्री. दिपक सावंत , चांदवड तालुका अध्यक्ष सौ. अनुराधा गोविंद ,कोपरगांव तालुका अध्यक्ष सौ. मंगलाताई आव्हाड , कोपरगांव तालुका कार्यकारी अध्यक्ष श्री. संजय आव्हाड तसेच सामाजिक कार्यकर्ती सौ.पुजाताई तुपलोंढे आदी उपस्थित होते.कोपरगांव पोलिस स्टेशनचे अधिकारी व ऋणानुबंधनचे पदाधिकारी यांनी दोन्ही कुटुंबातील बाबींवर सविस्तर चर्चा केली व योग्य तो निर्णय देऊन सौ.ज्योती शरद पवार यांना न्याय मिळवुन दिला. ऋणानुबंधन संस्थेच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button