बकरी ईद सावध व साधेपणाने साजरी करावी : कु अंकिता हर्षवर्धन पाटील
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे शनिवार दि. १ ऑगस्टला बकरी ईद साजरी करतानाही दक्षता घ्यावी असे आव्हान जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यात आपण सर्व धर्मिय सण अतिशय साधेपणाने साजरे करीत आहोत. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद सावध व साधेपणाने साजरी करावी, ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, नमाजही घरीच अदा करावी व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे संदर्भात मुस्लीम बांधवांन समवेत अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी संवाद साधला व आव्हान केले.






