मला मिळालेले गुण म्हणजे माझ्या आई वडिलांचे यशश्रुती सूर्यवंशी
लक्ष्मण कांबळे
माझे आईवडील अशिक्षित असल्याने माझ्या आई वडिलांचे एक स्वप्न हे माझ्या मुली पूर्ण करतील या आशेने माझ्या आई वडिलांनी मला स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळा दापोडी येथील शाळेत माझे नाव नोंदवले व माझे आई वडील पुणे शहरात हाताला मिळेल ते काम करून मिळालेल्या तुटपुंज्या रकमेतून घर सांभाळून आमच्या शाळेच्या खर्च भागऊन मला माझ्या आई वडिलांनी 10 वर्गापर्यंत शिक्षण दिल माझे आई वडील अशिक्षित असून त्यानी माझी पोरगी शिकून मोठी व्हावी सायबीन व्हावी ही इच्छा मनाशी बाळगलेले स्वप्न आहे तरी मी श्रुती विनायक सूर्यवंशी मला 10 वि परीक्षेत 83%20 एवढे मार्क मिळाले असून हे माझे मार्क पाहून माझ्या आई वडिलांचा आनंद द्विगुणीत झाला असून मी श्रुती एवढ्या वरच थांबणार नसून पुढील शिक्षण घेऊन एक चांगली अधिकारी बनून माझ्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवणार असलेचे श्रुती सूर्यवंशी ही आमच्या प्रतिनिधी शी बोलताना म्हणाली






